मराठा प्रीमिअर लीगचे उद्यापासून उपउपांत्य फेरीचे सामने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:16 AM2021-01-23T04:16:49+5:302021-01-23T04:16:49+5:30
जळगाव : मराठा प्रीमिअर लीगचे साखळी फेरीचे सामने संपले असून, आता उपउपांत्य फेरीच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे. उपउपांत्य फेरीत ...
जळगाव : मराठा प्रीमिअर लीगचे साखळी फेरीचे सामने संपले असून, आता उपउपांत्य फेरीच्या सामन्यांना सुरुवात झाली आहे.
उपउपांत्य फेरीत पर्ल होजिअरी संघ विरुद्ध प्रबोधिनी संघ असा सामना झाला. पर्लने नाणेफेक जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला; प्रबोधिनी संघाने निर्धारित १० षटकांत १०६ धावांचे माफक आव्हान ठेवले. पर्ल संघाने हे आव्हान ३ गड्यांच्या मोबदल्यात ११० धावा करून ७ विकेट ने सामना जिंकला.
विश्वेश देशमुख खेळाडूने २३ चेंडूत ४६ धावा करून सामनावीरचा पुरस्कार पटकाविला.
दुसऱ्या सामन्यात पाटील बायोटेक व स्नेहल प्रतिष्ठान या २ संघामध्ये झाला. या सामन्यात पाटील बायोटेकने निर्धारित १० षटकांत ६ गडी गमावून १३४ धावांचे स्नेहल प्रतिष्ठान या संघासमोर डोंगर उभारला. स्नेहल प्रतिष्ठान संघाने निर्धारित १० षटकांत ११५ धावा केल्या.