मराठा आरक्षण प्रश्नी सरकारने आश्वासन न पाळल्याने उद्रेक - राष्टÑवादी महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 12:07 PM2018-07-26T12:07:53+5:302018-07-26T12:08:05+5:30

कोपर्डी घटनेनंतर आरक्षण मागणीला जोर

The Maratha Reservation question is not followed by the assurances of the government. | मराठा आरक्षण प्रश्नी सरकारने आश्वासन न पाळल्याने उद्रेक - राष्टÑवादी महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ

मराठा आरक्षण प्रश्नी सरकारने आश्वासन न पाळल्याने उद्रेक - राष्टÑवादी महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ

Next

जळगाव : मराठा आरक्षणाबाबत राज्य शासनाने आश्वासन न पाळल्यानेच समाजबांधवांच्या भावनांचा उद्रेक झाला असल्याची टीका राष्टÑवादी महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी बुधवारी दुपारी राष्टÑवादी जिल्हा कार्यालयात ‘लोकमत’शी बोलताना केली.
मनपा निवडणुकीसाठी उमेदवारांच्या प्रचारासाठी दोन दिवसांच्या दौऱ्यावर आलेल्या वाघ यांनी जिल्ह्यातील माजी आमदार व इतर पदाधिकाºयांची बैठक घेऊन चर्चा केली. तसेच प्रभागांमध्ये जाऊन कॉर्नर बैठकाही घेतल्या.
त्या म्हणाल्या, मराठा आरक्षणाचे विधेयक राष्टÑवादी काँग्रेसनेच आणले आहे. आधी व आताही राष्टÑवादी लोकांसोबत आहे. पक्षाचे नेते अजित पवार, धनंजय मुंडे यांनी विधानसभा व विधानपरिषदेत याबाबत प्रखर भूमिका मांडली आहे. सरकारने आश्वासन न पाळल्याने उद्रेक झाला आहे.
कोपर्डी घटनेनंतर आरक्षण मागणीला जोर
मराठा समाज मात्र सर्वच मराठा समाजाच्या आमदारांवर नाराज आहे. धुळ्यात तर प्रतिकात्मक अंत्ययात्राही काढण्यात आली. मराठा समाजाचे मुख्यमंत्री होऊन गेले. तरीही आरक्षण का मिळाले नाही? असा सवाल केला जात आहे.
त्याबाबत विचारणा केली असता चित्रा वाघ म्हणाल्या की, समाजाच्या भावना आहेत. मात्र राष्टÑवादीने आरक्षणाबाबत आग्रही भूमिका घेतली. ईबीसी सवलतीसाठीही आधी पाठपुरावा केला.
आरक्षणाची मागणी पूर्वीही होती. मात्र कोपर्डी घटनेनंतर या मागणीने जोर पकडला. मात्र आम्ही आधीही व आताही समाजाच्या मागणीसोबतच आहोत.
फसवले गेल्याने उमटले पडसाद
आधी मराठा समाजाने लाखोंचे मूक मोर्चे काढले. ते शांततेत पार पडले. मात्र त्याची देखील खिल्ली उडवली गेली. त्यातच सरकारकडून दिलेले आश्वासन पाळले न गेल्याने हा उद्रेक होऊन त्याचे पडसाद उमटत असल्याचे वाघ यांनी सांगितले.

Web Title: The Maratha Reservation question is not followed by the assurances of the government.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.