रावेर येथे मराठा समाज गौरव सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 01:49 AM2018-09-17T01:49:35+5:302018-09-17T01:50:14+5:30
उपक्रम : समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान
रावेर/ऐनपूर, जि.जळगाव : मराठा समाजातील गुणवंत, प्रज्ञावंत व समाजभूषण गौरव समारंभ नुकताच झाला. अध्यक्षस्थानी पुणे येथील उद्योजक बी.डी. चौधरी होते.
शेनाबाई गोंडू पंडित मराठा समाज मंगल कार्यालयात आयोजित या सोहळ्यास जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, मंदोदरी पंडित, शाहपूरच्या नगराध्यक्ष शोभा लांडे, इंदूरचे उद्योगपती आर.एस.पाटील, पुणे येथील उद्योजक बी.डी.चौधरी, सुहास महाजन, श्रीराम पाटील, जळगावचे गोपाळ दर्जी, शाहपूर क्षेत्रीय मराठा समाजाचे अध्यक्ष प्रकाश महाजन, जि.प.सदस्य रंजना पाटील, तालुका कृषी अधिकारी सुधाकर पवार, फैजपूरचे फौजदार दत्तात्रय निकम, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष जे.के.पाटील, पी.आर. पाटील, बºहाणपूर पं.स.सभापती किशोर पाटील, पं.स.सदस्य योगेश पाटील, भाजपचे माजी तालुकाध्यक्ष सुरेश पाटील, दुर्गादास पाटील, राजेंद्र चौधरी, सुनील कोंडे व मराठा समाज विकास मंडळाचे अध्यक्ष राहुल पंडित यांचा मराठा समाज विकास मंडळाकडून स्वागत करण्यात आले.
प्रारंभी गुणवंतांचा गौरव करण्यात आला. दरम्यान, इंदूर येथील उद्योगपती आर एस पाटील यांनी त्यांच्या मोरगाव खुर्द येथील जलसंधारणाच्या विकासकामात अनमोल योगदान दिल्याबद्दल त्यांना मराठा समाज विकास मंडळातर्फे कै.डॉ.जे.जी.पंडित मराठा समाज भूषण पुरस्कार जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांच्याहस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या वेळी प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले व सत्कारमूर्ती आर एस पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन शेखर पाटील व आर.बी. महाजन यांनी केले. यशस्वितेसाठी डॉ.सुरेश पाटील, अंबादास महाजन, माजी आमदार अरूण पाटील, डॉ.एस.आर.पाटील, रामदास चौधरी, यादवराव पाटील पुंडलिक पाटील, यशवंत पाटील, काशिनाथ चौधरी, सूर्यकांत पाटील, अर्जुन महाजन, भिमराव पाटील, अर्जुन पाटील, डॉ.मनोहर पाटील, कडू पाटील, अॅड.व्ही.पी.महाजन, धनंजय महाजन, संतोष वाघ, संतोष महाजन, युवराज महाजन, भगवान गायकवाड यांनी परिश्रम घेतले. आभार दिलीप पाटील व वामनराव पाटील यांनी मानले.