जळगावात ‘मविप्र’प्रश्नी मराठा समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2018 01:45 PM2018-04-16T13:45:28+5:302018-04-16T13:46:12+5:30
विविध संस्थांचा पाठिंबा
आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १६ - जळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या ताब्याबाबत शिक्षण विभाग व पोलीस प्रशासन यांच्यामुळे दिशाभूल होत असून संचालक मंडळाच्या निवडणुकीत निवडून आलेल्या नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखालील अधिकृत संचालक मंडळालाच संस्थेत प्रवेश देण्यास मज्जाव केला जात असल्याच्या निषेधार्थ सोमवारी सकाळी मराठा समाजाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यामध्ये जिल्हाभरातील हजारो समाजबांधव मोठ्या संख्येन सहभागी झाले होते.
संस्थेच्या २०१५मध्ये झालेल्या निवडणुकीत नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ निवडून आले तरीदेखील शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी भोईटे गट यात निवडून आल्याने त्यांच्याकडे संस्थेचा ताबा देण्याबाबत पत्र दिल्याने तसेच पोलीस या बाबत हस्तक्षेप करीत असल्याच्या निषेधार्थ या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ््यापासून मोर्चास सुरुवात झाली. जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा पोहचल्यानंतर या ठिकाणी सभा झाली. यासाठी विविध संस्था, संघटनांकडून या मोर्चास पाठिंबा दिला. सभेनंतर जिल्हाधिकारी किशोर राजेस निंबाळकर यांना निवेदन देण्यात आले.
मोर्चा दरम्यान सरकार व पोलीस प्रशासनाविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.