मराठी भाषा दिन उत्साहात साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:18 AM2021-03-01T04:18:54+5:302021-03-01T04:18:54+5:30

विवेकानंद प्रतिष्ठान विवेकानंद प्रतिष्ठान संचलित प्राथमिक शाळा ,वाघ नगर, येथे विज्ञान सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहात सर्व ...

Marathi Language Day celebrated with enthusiasm | मराठी भाषा दिन उत्साहात साजरा

मराठी भाषा दिन उत्साहात साजरा

Next

विवेकानंद प्रतिष्ठान

विवेकानंद प्रतिष्ठान संचलित प्राथमिक शाळा ,वाघ नगर, येथे विज्ञान सप्ताह साजरा करण्यात आला. या सप्ताहात सर्व प्रयोगांचे व्हिडिओ बनवून व्हॉट्सॲप द्वारे विद्यार्थ्यांना पाठवण्यात आले व विद्यार्थ्यांकडून प्रयोगाची माहिती व निष्कर्ष यांचा अभ्यास करून घेण्यात आला. विज्ञान सप्ताहासाठी शिक्षिका जयश्री वंडोळे, सुयोग गुरव, मुख्याध्यापक हेमराज पाटील यांनी परिश्रम घेतले.

चांदसरकर विद्यामंदिर

कै. गि. न. चांदसरकर प्राथमिक विद्यालयात मराठी भाषा दिनानिमित्त वि. वा. शिरवाडकर यांच्या प्रतिमेचे शाळेतील शिक्षक श्याम ठाकरे यांच्याहस्ते पुजन करण्यात आले. यावेळी जयश्री पाटील, स्वप्नील भोकरे, महेश तायडे, भूषण अमृतकार आदी शिक्षक उपस्थित होते.

प. वि. पाटील विद्यालय

मराठी राजभाषा दिनानिमित्त शाळेचे शिक्षण समन्वयक चंद्रकांत भंडारी व मुख्याध्यापिका रेखा पाटील यांच्या हस्ते कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर शिक्षकांनी व विद्यार्थ्यांना शिरवाडकरांच्या वादळवेडी, माझ्या मातीचे गायन , विराणी अशा कवितांचे वाचन करून दाखविले. यावेळी शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

सरस्वती विद्या मंदिर

सरस्वती विद्या मंदिर येथे मराठी राजभाषा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मराठी भाषेतून आवडत्या पाठाचे अभिरुची वाचन उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमाचे आयोजन सुवर्णलता अडकमोल यांनी केले. या उपक्रमात वैष्णवी बारी, पुनम पाटील , ऐश्वर्या बारी , भावेश पाटील या विद्यार्थांनी वाचन केले. संस्थेच्या संचालिका प्रतीक्षा पाटील व माध्यमिक विभागाच्या मुख्याध्यापिका दिपाली देवरे यांनी या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

प्रगती विद्यामंदिर

प्रगती विद्यामंदिर शाळेत मराठी दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे चेअरमन प्रेमचंदा ओसवाल, शिक्षक मनोज भालेराव, मुख्याध्यापक मनीषा पाटील, ज्योती कुलकर्णी, प्र. मुख्याध्यापक संगीता गोहील, शिक्षक सुवर्णा शिराळकर, नम्रता पवार, अविदीप पवार, विजया पाटील, रत्नप्रभा पवार, नीलिमा पाटील, सोनल चौधरी, ज्योती बागुल, अलका करणकर यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

अभियांत्रिकी महाविद्यालय

श्रमसाधना बॉम्बे ट्रस्ट संचलित अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालयात मराठी भाषा गौरव दिना निमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एस. वाणी , उपप्राचार्य डॉ. एस. पी. शेखावत, प्रा. एम. व्ही रावलानी , डॉ. सुधीर पाटील, एन. एम. काझी, प्रा. कृष्णा श्रीवास्तव व प्रा. रोहिदास बी. सांगोरे उपस्थित होते. सूत्रसंचालन प्रा.व्ही.एस.पवार यांनी केले.

कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या भाषा अभ्यास प्रशाळा व संशोधन केंद्राच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ‘कथा : निर्मिती आणि सादरीकरण’ या विषयावर लेखक, कथाकार बालाजी सुतार यांच्या ऑनलाईन परिसंवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रशाळेचे संचालक प्रा.म.सु.पगारे, प्रा.बी.व्ही.पवार, इंग्रजी विभागप्रमुख प्रा. मुक्ता महाजन, हिंदी विभागप्रमुख डॉ. सुनील कुलकर्णी, प्रा. नेत्रा उपाध्ये उपस्थित होत्या. प्रा.आशुतोष पाटील यांनी आभार मानले.

झांबरे विद्यालय

ए.टी.झांबरे माध्यमिक विद्यालयात कवि कुसुमाग्रज यांची जयंती मराठी भाषा दिन म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक डी .व्ही चौधरी, पर्यवेक्षिका प्रणिता झांबरे, मराठी विभागप्रमुख प्रतिभा लोहार, वर्षा राणे, माधुरी भंगाळे, डी. ए. पाटील, सुचिता शिरसाट, डी. बी चौधरी, आर. एन. तडवी, व इतर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Web Title: Marathi Language Day celebrated with enthusiasm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.