Gudi Padwa 2018 : जळगाव येथे नववर्षाचे जल्लोषात स्वागत, शोभायात्रा, पथसंचलन व गावगुढीचे पूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2018 01:08 PM2018-03-18T13:08:58+5:302018-03-18T13:08:58+5:30

विविध संस्थांतर्फे भरगच्च कार्यक्रम

Marathi new year celebration | Gudi Padwa 2018 : जळगाव येथे नववर्षाचे जल्लोषात स्वागत, शोभायात्रा, पथसंचलन व गावगुढीचे पूजन

Gudi Padwa 2018 : जळगाव येथे नववर्षाचे जल्लोषात स्वागत, शोभायात्रा, पथसंचलन व गावगुढीचे पूजन

Next
ठळक मुद्देराष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे संचलनसंस्कार भारतीतर्फे पाडवा पहाट

आॅनलाइन लोकमत
जळगाव, दि. १८ - मराठी नववर्ष तथा गुढीपाडव्यानिमित्त रविवार, १८ रोजी शहरातील विविध संघटना तसेच संस्थांतर्फे कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊन नववर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. शोभायात्रा, गुढी पूजन, महेश चौक प्रवेशद्वाराचे लोकार्पण, महिलांचा सत्कार, पथसंचलन मोटरसायकल रॅली इत्यादी कार्यक्रम उत्साहात पार पडले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे संचलन
गुढी पाडव्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे शहरात विविध ठिकाणी पथसंचलन करण्यात आले.
महेश चौक प्रवेशद्वाराचे आज लोकार्पण
जळगाव जिल्हा माहेश्वरी सभातर्फे गुढी पाडव्यानिमित्त रविवारी सकाळी ९ वाजता महेश चौक प्रवेशद्वाराचे माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्याहस्ते लोकार्पण करण्यात आले. या वेळी आमदार स्मिता वाघ, महापौर ललित कोल्हे, उपमहापौर गणेश सोनवणे, माजी महापौर नितीन लढ्ढा, कृउबा चेअरमन लक्ष्मण पाटील, अ‍ॅड. सुरेंद्र काबरा, बाळकृष्ण बेहडे, मधूर भट्टड आदी उपस्थित होते. समाजाच्या सहभागातून सुशोभीकरण केलेल्या महेश चौकात भव्य गुढी उभारून पूजन करण्यात आले. यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीराम मंदिर संस्थानतर्फे शोभायात्रा
श्रीराम मंदिर संस्थानातर्फे गादीपती हभप मंगश महाराज यांच्या नेतृत्वाखाली १८ ते २६ मार्च दरम्यान श्रीरामनवमी महोत्सव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे़ गुढीपाडव्याच्या दिवशी या सोहळ्यास सुरूवात झाली. असून पहाटे ४ वाजता काकड आरती, महाभिषेक तसेच गरूड ध्वजस्तंभारोपण, त्यानंतर सकाळी ७ वाजता महाआरती होऊन ७़३० वाजता नववर्ष स्वागत यात्रा निघाली. रथचौकात गावगुढीपूजन, त्यानंतर महाआरती आणि भजन-कीर्तन झाले.
संस्कार भारतीतर्फे पाडवा पहाट
भारतीय नववर्षाच्या प्रारंभी संस्कार भारतीतर्फे रविवारी सकाळी मनपाच्या १७ मजली वास्तूच्या प्रांगणात ‘पाडवा पहाट’ हा कार्यक्रम सादर झाला. प्रसन्न पहाटे व वृक्षराजीने नटलेल्या आणि गार, आल्हाददायक वातावरणात, निळ्या आकाशात विहार करणाऱ्या विविध पक्षी समूहांच्या साक्षीने ही ‘पाडवा पहाट’ उत्साहात झाली. यामध्ये विविध गीत सादर करून नववर्षाचे स्वागत करण्यात आले.
भारत विकास परिषदकडून शोभायात्रेचे स्वागत
हिंदू नववर्षानिमित्त श्रीराम मंदिर संस्थानतर्फे सकाळी गायत्री मंदिरापासून शोभायात्रा काढण्यात आली. भारत विकास परिषदतर्फे घाणेकर चौकात स्वागत करण्यात आले.

 

Web Title: Marathi new year celebration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.