सामान्य जन बोलतात तोपर्यंत मराठी आबाधित राहिल - प्रा.डॉ. केशव देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2019 12:28 PM2019-09-08T12:28:29+5:302019-09-08T12:29:05+5:30

बोली भाषा जतन करणे आपले काम

Marathi will remain intact as long as the general public speaks | सामान्य जन बोलतात तोपर्यंत मराठी आबाधित राहिल - प्रा.डॉ. केशव देशमुख

सामान्य जन बोलतात तोपर्यंत मराठी आबाधित राहिल - प्रा.डॉ. केशव देशमुख

Next

चुडामण बोरसे 

जळगाव - मराठीचे दिवस वाईट नाहीत, जोपर्यंत सामान्य लोक ती बोलत आहेत, त्यांची जीभ शाबूत आहे. तोपर्यंत मराठी अबाधित राहिल, यासाठी आपली बोली भाषा जतन करणे आणि तिचे संवर्धन करणे सर्वांचीच जबाबदारी आहे, असे मत राज्याच्या भाषा सल्लागार समितीचे सदस्य प्रा.डॉ. केशव देशमुख (नांदेड) यांनी व्यक्त केले.
प्रश्न- भाषा सल्लागार समितीचे नेमके काम काय आहे?
उत्तर- विविध प्रकारचे कोष निर्माण करणे. याशिवाय मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार आणि अमराठी वर्गापर्यंत मराठी भाषा घेऊन जाणे हा भाषा सल्लागार समितीचा उद्देश आहे. .
प्रश्न- मराठीला अभिजात भाषेचा
दर्जा मिळावा, यासाठी काय प्रयत्न
सुरु आहेत?
उत्तर- मूळत: आपल्याकडे विविध बोली भाषा बोलल्या जातात. कथा, कादंबरी, कविता ह्या आता बोलीभाषेत येत आहेत. बोली भाषा जतन करणे हा या समितीचा मूळ उद्देश आहे आणि ती टिकवणे आपले काम आहे.
प्रश्न- मराठीबद्दल आस्था
दाखवायची आणि मुुलांना
इंग्रजी शाळेत टाकायचे? त्याबद्दल?
उत्तर - मूळात इंग्रजीशी वैर असण्याचे कारण नाही. मराठी जशी ज्ञानाची भाषा आहे तशी इंग्रजीही आहे. इंग्रजी ही जगाला जोडणारी भाषा आहे. मराठी आपली मातृभाषा आहे. ती जतन करणे आणि सांभाळणे आपल्या हाती आहे. भाषा सल्लागार समितीच्या माध्यमातून उपयोजित मराठी पुढे यावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आता ते यापुढे सुरु राहतील.
अनेक पुरस्कार
प्रा. केशव देशमुख यांना सन २००७ मध्ये राज्य शासनाचा केशवसूत पुरस्कार तर चालणारे अनवाणी पाय या पुस्तकासाठी सन २००७ मध्ये राज्य शासनाचाच बालकवी पुरस्कार देण्यात आला आहे.
पीएच.डी.
चोपडा येथील कवी राजेंद्र पारे यांच्या पुस्तक प्रकाशनासाठी ते जळगावात आले होते. त्यावेळी त्यांनी लोकमतशी संवाद साधला. प्रा. देशमुख हे स्वामी रामानंद तीर्थ मराठावाडा विद्यापीठात मानव विज्ञान शाखेचे डीन आहेत. त्यांनी लिहिलेल्या साहित्याला अनेक पुरस्कार मिळाले आहेत. त्यांचे सहा विद्यार्थी पीएच.डी. व तेवढेच विद्यार्थी एम.फील झाले आहेत.
आता काही दिवसापूर्वीच भाषा सल्लागार समितीची स्थापना झाली आहे. पुढील बैठकीत चांगले निर्णय होतील - प्रा. केशव देशमुख

Web Title: Marathi will remain intact as long as the general public speaks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव