चोपडा येथे महात्मा गांधी शिक्षण मंडळातर्फे मॅरेथॉन स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2019 03:52 PM2019-02-02T15:52:58+5:302019-02-02T15:54:01+5:30
महात्मा गांधी शिक्षण मंडळातफेर् ‘धावणारा कमावतो, तर न धावणारा गमावतो’ (विनर्स रन लुझर नन) हे ब्रीद घेऊन शनिवारी सकाळी मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली.
चोपडा, जि.जळगाव : महात्मा गांधी शिक्षण मंडळातफेर् ‘धावणारा कमावतो, तर न धावणारा गमावतो’ (विनर्स रन लुझर नन) हे ब्रीद घेऊन शनिवारी सकाळी मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. यात संस्थांतर्गत ३५० विद्यार्थी, तर १०० प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतरांनी सहभाग घेतला.
महाविद्यालयाच्या प्रांगणात संस्थाध्यक्ष अॅड.संदीप सुरेश पाटील, पोलीस उपनिरीक्षक अर्चना करपुडे, उपनगराध्यक्षा सुप्रिया सनेर यांनी हिरवा झेंडा दाखवल्यावर स्पर्धा सुरू झाली. या वेळी प्राचार्य डॉ.डी.एस.सूर्यवंशी, प्राचार्य प्रा.जी.बी.शिंदे, मुख्याध्यापक एन.एस.सोनवणे, मुख्याध्यापक बी.जे.सोनवणे यांच्यासह सर्व विद्याशाखांचे उपप्राचार्य, पर्यवेक्षक उपस्थित होते.
स्पर्धा चार गटात झाली. त्यात विद्यार्थ्यांसाठी ५.कि.मी., विद्यार्थिनी व महिला स्टाफसाठी २ कि.मी., तर पुरुष स्टाफसाठी ३ कि.मी.अंतर निर्धारित करण्यात आले होते.
स्पर्धेत महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित कला, शास्र व वाणिज्य महाविद्यालय, शिक्षण शास्र विद्यालय, महात्मा गांधी माध्यमिक विद्यालय, डॉ.सुरेश जी.पाटील आॅक्सफर्ड इंग्लिश मीडियम स्कूल, शरदचंद्रिका सुरेश पाटील औषध निर्माण पदविका व पदवी महाविद्यालय, शरदचंद्रिका सुरेश पाटील तंत्र शिक्षण पदविका महाविद्यालय आदी विद्याशाखेतील विद्यार्थी, शिक्षक सहभागी झाले होत.े
स्पर्धेत विद्यार्थी पुरुष गटात प्रथम विशाल नामदेव धनगर, द्वितीय नीलेश सतीश सोनवणे, तृतीय खैरनार योगेश ज्ञानेश्वर, विद्यार्थिनी महिला गटात प्रथम ममता देवीदास पाटील, द्वितीय सोनाली काशीनाथ माळी, तृतीय गायत्री प्रभाकर धनगर, पुरुष शिक्षक व शिक्षकेतर गटात प्रथम पवन संजय सोनवणे, द्वितीय जेकराम इमानसिंग बारेला, तृतीय मोतीराम भियानसिंग पावरा, उत्तेजनार्थ प्रा.चंद्रकांत देवरे, प्रा.अतुल पाटील, प्रा.मधुचंद्र भुसारे, अशोक साळुंखे, महिला शिक्षक व शिक्षकेतर गट प्रथम लता मुकेश चौधरी, द्वितीय प्रियंका अरुण पाटील, तृतीय प्रतीक्षा सुधाकर पाटील, उत्तेजनार्थ प्रा.माया शिंदे, प्रा.अनिता सांगोरे आदी स्पर्धक विजेते ठरले.
नगराध्यक्षा मनीषा जीवन चौधरी, उपनागराध्यक्षा सुरेखा महाजन आदींच्या हस्ते चारही गटातील विजेत्यांना अनुक्रमे ५००, ३००, २०० रुपये रोख बक्षीस व प्रमाणपत्र देवून गौरव करण्यात आला.
बक्षीस वितरण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.शैलेश वाघ यांनी, तर आभार क्रीडा संचालिका प्रा.क्रांती क्षीरसागर यांनी मानले.