भडगाव तालुक्यातील वाडे येथे आज मरीआईचा यात्रोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 30, 2019 03:31 PM2019-08-30T15:31:43+5:302019-08-30T15:33:41+5:30
भडगाव तालुक्यातील वाडे येथे पोळ्यानिमित्त ग्रामदैवत मरीआईचा यात्रोत्सव ३१ आॅगस्ट व १ सप्टेंबर रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
अशोक परदेशी
भडगाव, जि.जळगाव : तालुक्यातील वाडे येथे पोळ्यानिमित्त ग्रामदैवत मरीआईचा यात्रोत्सव ३१ आॅगस्ट व १ सप्टेंबर रोजी परंपरेनुसार यावर्षीही भरणार आहे. यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यात्रोत्सवात ३१ रोजी रात्री ९ वाजता माध्यमिक विद्यालयात रविभाऊ धुळेकर यांचा लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होईल. याआधी तगतरावाची मिरवणूक सायंकाळी ५ वाजता वाजत गाजत निघणार आहे. येथील चौकापासून ते गिरणा काठावरील ग्रामदैवत मरीआईच्या मंदिरावर ही मिरवणूक निघेल. यंदा तगतरावाला जोडी जुंपण्याचा मान प्रगतीशील शेतकरी राकेश सुरेश पाटील यांना देण्यात आला आहे.
दि.१ रोजी सकाळपासून बसस्थानक परिसरात यात्रोत्सव भरणार आहे. या यात्रोत्सवात विविध हॉटेल, दुकाने, पाळणे यासह जिल्ह्यातील अनेक व्यावसायिकांचा समावेश असतो.
याचदिवशी दुपारी १२ वाजता गिरणा नदीच्या पात्रात कुस्त्यांची दंगलही आयोजित करण्यात आली आहे. यात्रोत्सवासह विविध कार्यक्रमांचा लाभ घ्यावा, असे आवाहन वाडे येथील ग्रामपंचायतीचे पदाधिकारी, ग्रामस्थ यासह आयोजकांमार्फत करण्यात आले आहे.