तीन लाखांसाठी विवाहितेचा छळ; पतीसह पाच जणांवर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:15 AM2021-05-08T04:15:45+5:302021-05-08T04:15:45+5:30
जळगाव : बांधकामासाठी माहेरहून ३ लाख रुपये आणावे यासाठी विवाहितेचा मानसिक-शारीरिक छळ करणाऱ्या पतीसह पाच जणांवर जळगाव तालुका ...
जळगाव : बांधकामासाठी माहेरहून ३ लाख रुपये आणावे यासाठी विवाहितेचा मानसिक-शारीरिक छळ करणाऱ्या पतीसह पाच जणांवर जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील कानळदा येथील माहेर असलेल्या पौर्णिमा यांचा विवाह यावल तालुक्यातील चिंचोली येथील भूषण अशोक साळुंखे यांच्याशी विवाह झाला. लग्नाचे सुरुवातीचे दिवस चांगले गेले. त्यानंतर पती भूूषण साळुंखे यांनी विवाहितेला माहेरहून ३ लाख रुपये आणावे यासाठी छळ करण्यास सुरुवात केली. तसेच अशोक जयराम साळुंखे, जयश्री अशोक साळुंखे, ललित अशोक साळुंखे, आकाश अशोक साळुंखे (सर्व रा. चिंचोली, ता. जळगाव) यांनी देखील पैश्यांसाठी विवाहितेचा छळ केला. दरम्यान, हा प्रकार सहन न झाल्याने विवाहिता माहेरी निघून आली. पुढील तपास पोलीस नाईक उमेश ठाकूर हे करीत आहे.