दोन लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:14 AM2021-02-08T04:14:20+5:302021-02-08T04:14:20+5:30
जळगाव - नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी माहेरहुन दोन लाख रुपये आणावे या मागणीसाठी रामेश्वर कॉलनी येथील विवाहितेचा पतीसह ...
जळगाव - नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी माहेरहुन दोन लाख रुपये आणावे या मागणीसाठी रामेश्वर कॉलनी येथील विवाहितेचा पतीसह सासरच्या लोकांनी छळ केला. ६ मे २०१८ ते २३ मे २०१९ दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरुन एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बळीराम सपकाळे तपास करीत आहेत.
--------------------
पाच लाख रुपयांसाठी विवाहितेचा छळ
जळगाव - हुंड्यासाठी माहेरहुन पाच लाख रुपये आणावे या मागणीसाठी वाघनगर येथील विवाहितेचा पतीसह सासरच्या लोकांनी छळ केला. २७ एप्रिल २०१४ ते ६ फेब्रुवारी २०२० दरम्यान ही घटना घडली. या प्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरुन तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिल मोरे तपास करीत आहेत.
-------------------------
चारित्र्यावर संशय घेत विवाहितेस मारहाण
जळगाव - आहुजानगरात राहणाऱ्या ३० वर्षीय विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेत तिला पतीने मारहाण केली. तसेच सासरच्या लोकांनी दोन लाख रुपये माहेरहून आणण्याची मागणी करीत तिचा छळ केला. ३० मे २०१७ ते ८ जानेवारी २०२० दरम्यान ही घटना घडली आहे. या प्रकरणी विवाहितेने दिलेल्या फिर्यादीवरुन पतीसह सहा जणांच्या विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.