सायगाव येथे बाजार भरतो स्टँडवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:18 AM2021-08-23T04:18:50+5:302021-08-23T04:18:50+5:30
मालेगाव, नांदगाव, चाळीसगाव, धुळे तालुक्यातील बऱ्याच गावांतील दुकाने या बाजारासाठी येत असतात. यासाठी बाजारातील गर्दी लक्षात घेता ग्रामपंचायतीने ...
मालेगाव, नांदगाव, चाळीसगाव, धुळे तालुक्यातील बऱ्याच गावांतील दुकाने या बाजारासाठी येत असतात. यासाठी बाजारातील गर्दी लक्षात घेता ग्रामपंचायतीने जागतिक बँक अर्थसाहाय्यित महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्प कृषी पणन पुणेअंतर्गत बाजाराच्या आवारात पेव्हर ब्लॉक बसविले आहेत; पण आता सायगाव येथील बाजार चक्क बसस्टँडवर भरत असल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.
जुन्या स्टँडपासून ते नव्या स्टँडपर्यंत बाजार भरत असल्याने वाहतुकीसाठी कोंडी होत आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने आक्रमकपणा दाखवून बाजार हा बाजारपेठेतच भरला जावा, असे धोरण राबवावे, अशी मागणी होत आहे. बाजारपेठेचे एवढे लाखो रुपये खर्च करून सुशोभिकरण करण्यात आले ते कशासाठी, असा सवाल केला जात आहे.
220821\22jal_3_22082021_12.jpg
सायगाव येथे दर शुक्रवारी बाजार भरतो. त्या बाजाराचे हे दृश्य. (छाया : गोकुळ मंडळ, सायगाव )