बाजार समितीतून धान्याच्या गोण्या लांबविणाऱ्याला पकडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2019 12:15 PM2019-03-29T12:15:48+5:302019-03-29T12:16:27+5:30

गुन्हा दाखल : दुचाकीवरील एक जण फरार; सुरक्षा रक्षकाची सतर्कता, झटापटीत पळाला साथीदार; घटना सीसीटीव्हीत कैद

The marketman was caught by the market collector | बाजार समितीतून धान्याच्या गोण्या लांबविणाऱ्याला पकडले

बाजार समितीतून धान्याच्या गोण्या लांबविणाऱ्याला पकडले

Next



जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील दुकानांच्या बाहेर ठेवलेले गहू, दादर व बाजरीच्या गोण्या दुचाकीवरुन लांबविण्याऱ्या दोघांना सुरक्षा रक्षकांची रंगेहाथ पकडले. त्यात झटापटीत एक जण फरार झाला असून एका जणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या संशयिताचे नाव विठ्ठल आत्माराम नेरकर (रा.दत्त नगर, रामेश्वर कॉलनी) असे आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात आशिष शंकर अग्रवाल (३२, रा.आयोध्या नगर, जळगाव) यांचे दोन दुकान आहेत.
गहू, दादर व बाजरी विक्री करण्याचा त्यांचा व्यवसाय आहे. रात्री दुकान बंद करुन जाताना धान्याच्या गोण्या काही बाहेरच ठेवलेल्या असतात. त्यांच्या दुकानाबाहेरुन सतत गोण्या चोरी होत असल्याने अग्रवाल यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात दोन जण दुचाकीवरुन गोण्या चोरुन नेत असल्याचे दिसून आले. त्यामुळे अग्रवाल यांनी सुरक्षा रक्षक विजय पितांबर सोनवणे व समाधान रमेश सोनवणे यांना दुकानातून दोन दिवसापासून धान्याच्या गोण्या चोरी होत असल्याचे सांगून आज रात्री बारीक लक्ष ठेवण्याच्या सूचना केल्या होत्या.
याप्रकरणी दोघांविरुध्द चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक फौजदार राजाराम पाटील करीत आहेत.
दुचाकीवर ठेवल्या ९ गोण्या... गुरुवारी पहाटे साडे चार वाजता दुचाकीवरुन (क्र.एम.एच.१९ ए.बी.१७७७) दोन जण आले. त्यांनी ६० किलो वजनाच्या दादरच्या चार, ३० किलो वजनाच्या बाजरीच्या चार व ५० किलो वजनाची गव्हाची एक अशा १४ हजार ६६० रुपये किमतीच्या गोण्या दुचाकीवर ठेवून पलायन करणार तितक्यात सुरक्षा रक्षक विजय सोनवणे यांनी दोघांना पकडले. त्यावेळी जोरदार झटापटी झाली. त्यात एक जण पळून गेला. दरम्यान, त्याच वेळी गस्तीवर असलेले एमआयडीसीचे पोलीस स्टेशनचे तुकाराम निंबाळकर बाजार समितीकडून जात असल्याचे सुरक्षा रक्षकाला दिसले. त्याने त्यांना आवाज देऊन बोलावून घेतले. पकडण्यात आलेल्या संशयिताला त्याचे नाव विचारले असता त्याने विठ्ठल आत्माराम नेरकर असे सांगितले. दरम्यान, यावेळी सुरक्षा रक्षकाने मालक अग्रवाल यांनाही फोन करुन बोलावून घेतले.

Web Title: The marketman was caught by the market collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.