लॉकडाऊनमुळे जळगावातील बाजारपेठ व रस्ते पडले ओस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:11 AM2021-03-29T04:11:26+5:302021-03-29T04:11:26+5:30

जळगाव : शहरात मागील महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यातच होळी व धुलिवंदनच्या दिवशी नागरिकांची गर्दी होऊ शकते, यासाठी ...

Markets and roads in Jalgaon fell due to lockdown | लॉकडाऊनमुळे जळगावातील बाजारपेठ व रस्ते पडले ओस

लॉकडाऊनमुळे जळगावातील बाजारपेठ व रस्ते पडले ओस

googlenewsNext

जळगाव : शहरात मागील महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यातच होळी व धुलिवंदनच्या दिवशी नागरिकांची गर्दी होऊ शकते, यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात ३ दिवस कडक निर्बंधाची घोषणा केली. रविवारी पहिल्याच दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

जळगाव शहरातील मुख्य बाजारपेठेसह टाॅवर चाैक, नवीन बसस्थानक चाैक, आकाशवाणी चाैक, अजिंठा चाैफुली चाैक, काशिनाथ चाैफुली चाैक, खोटे नगर, शिवकाॅलनी या भागातील रस्ते सकाळपासूनच ओस पडले होते. चौकाचौकांत तैनात असलेल्या पोलिसांकडून तुरळक येणाऱ्या वाहनधारकांची चौकशी केली जात होती. काम नसताना फिरणाऱ्यांना समज देवून परत पाठविण्यात येत होते.

लाॅकडाऊन सोबतच रविवारी तापमानाचा पारा ४० अंशापर्यंत पोहचल्याने अनेकांनी घराबाहेर पडणे टाळले.लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : शहरात मागील महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढला आहे. त्यातच होळी व धुलिवंदनच्या दिवशी नागरिकांची गर्दी होऊ शकते, यासाठी जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात ३ दिवस कडक निर्बंधाची घोषणा केली. रविवारी पहिल्याच दिवशी नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

जळगाव शहरातील मुख्य बाजारपेठेसह टाॅवर चाैक, नवीन बसस्थानक चाैक, आकाशवाणी चाैक, अजिंठा चाैफुली चाैक, काशिनाथ चाैफुली चाैक, खोटे नगर, शिवकाॅलनी या भागातील रस्ते सकाळपासूनच ओस पडले होते. चौकाचौकांत तैनात असलेल्या पोलिसांकडून तुरळक येणाऱ्या वाहनधारकांची चौकशी केली जात होती. काम नसताना फिरणाऱ्यांना समज देवून परत पाठविण्यात येत होते.

लाॅकडाऊन सोबतच रविवारी तापमानाचा पारा ४० अंशापर्यंत पोहचल्याने अनेकांनी घराबाहेर पडणे टाळले.

Web Title: Markets and roads in Jalgaon fell due to lockdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.