कारंजालाड येथील प्रेमीयुगलाचा जळगावात लग्नाचा डाव फसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2017 12:08 PM2017-07-08T12:08:09+5:302017-07-08T12:08:09+5:30

18 वर्ष पूर्ण होताच लग्नासाठी मुलगी मुलासोबत घरून पळाली़

Marriage of love lover in Karanjalad in Jalgaon is unsuccessful | कारंजालाड येथील प्रेमीयुगलाचा जळगावात लग्नाचा डाव फसला

कारंजालाड येथील प्रेमीयुगलाचा जळगावात लग्नाचा डाव फसला

Next

ऑनलाईन लोकमत

 
जळगाव, दि.8 - सज्ञान नसल्याने प्रेमविवाह करता येत नव्हता़ मात्र वयाचे 18 वर्ष पूर्ण होताच लग्नासाठी मुलगी मुलासोबत घरून पळाली़ मात्र विवाहपूर्वीच पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे या प्रेमीयुगुलाची कहाणी अधुरी राहिली आह़े शुक्रवारी दुपारी कारंजालाड (वाशिम) येथील प्रेमीयुगुलाला पोलिसांनी जळगावातील रोहनवाडी येथून ताब्यात घेतले आह़े मुलगी मुलासोबत लग्न करण्यास ठाम असून दोघे सज्ञान असल्याने पोलिसांचेही कारवाईसाठी हात बांधले होत़े
कारंजालाड येथील तरुण पंकज (वय 23,) व माधुरी (दोघांची नावे बदललेली आहेत) या दोघांचे तीन वर्षापासून एकमेकांवर प्रेम आह़े घरगुती वादामुळे पवनची आई काही वर्षापासून जळगाव शहरातील आव्हाणे रस्त्यावरील रोहनवाडीत वास्तव्यास आह़े  पवन व माधुरी हे कारंजालाड येथे एकाच गल्लीत राहतात़
प्रेम प्रकरणाची माहिती पंकजच्या आई वडीलांना माहिती आहे. मात्र माधुरीच्या घरच्यांचा लग्नास विरोध होता़ लग्न केल्यास सज्ञान नसल्याने पंकज अडचणीत येऊ शकतो किंवा पोलिसात गुन्हा दाखल होऊ शकतो म्हणून पंकजच्या आईने माधुरीची समजूत घातली होती़ त्यामुळे माधुरी 18 वर्षे पूर्ण होण्याच्या प्रतीक्षेत होती़ कारंजालाड येथील पोलीस ठाण्यात माधुरी बेपत्ता असल्याबाबत नोंद आह़े तालुका पोलिसांना रोहनवाडी येथे कारंजालाड येथून आलेले प्रेमीयुगुल नोंदणी विवाह करत असल्याची माहिती मिळाली़ त्यानुसार साहाय्यक पोलीस निरीक्षक सारिका कोडापे यांनी शुक्रवारी दुपारी 12़30 वाजता रोहनवाडी गाठल़े पोलिसांनी दोघांचे जबाब नोंदवून घेतल़े 
18 वर्ष पूर्ण होताच मुलीने काढला पळ
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 30 जून रोजी माधुरीला 18 वर्षे पूर्ण झाल़े विवाहासाठीचा अडथळा दूर झाल्याने दोघे कारंजालाड येथून जळगावला आल़े 2 रोजी पंकज हा माधुरीसह रोहनवाडी येथील आईकडे आला़ गेल्या पाच दिवसांपासून दोघे येथेच वास्तव्यास आहेत़
मी याच मुलासोबत लग्न करणार
जबाब लिहून घेण्यापूर्वी पोलिसांनी माधुरीच्या आई-वडिलांना याबाबत माहिती दिली़ त्यानुसार ते जळगावला येण्यासाठी निघाले होते. पंकजची आई  व नातेवाईकही पोलीस ठाण्यात पोहचल़े याठिकाणी पोलिसांनी माधुरीची समजूत घातली असता मी याच मुलासोबत लग्न करीन, आई-वडिलांसोबत जाणार नाही, असे तिने पोलिसांना सांगितल़े सज्ञान असल्याने पोलिसांचेही कारवाईसाठी हात बांधल़े

Web Title: Marriage of love lover in Karanjalad in Jalgaon is unsuccessful

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.