लग्नानंतर मुलास मारहाण; मुलीस पळविण्याचा प्रयत्न

By admin | Published: January 28, 2017 12:08 AM2017-01-28T00:08:23+5:302017-01-28T00:08:23+5:30

नोंदणी विवाह : नोंदणी कार्यालयातून माहिती पुरविल्याचा आरोप

Married after the marriage; Attempt to flee the girl | लग्नानंतर मुलास मारहाण; मुलीस पळविण्याचा प्रयत्न

लग्नानंतर मुलास मारहाण; मुलीस पळविण्याचा प्रयत्न

Next

जळगाव : जिल्हाधिकारी कार्यालयातील विवाह नोंदणी कार्यालयात नोंदणी विवाह झाल्यानंतर मुलास मारहाण करून मुलीच्या नातेवाइकांनी मुलीस सोबत घेऊन एका वाहनातून पळ काढला. याबाबत लग्न केलेल्या युवकाने लागलीच पोलिसात तक्रार दिली. पोलिसांच्या सतर्कतेने मुलीस अमळनेर येथून एका वाहनातून तिच्या नातेवाइकांच्या तावडीतून सोडविण्यात आले. शुक्रवारी हा नाटय़मय प्रकार घडला.
   कुंझर ता.चाळीसगाव येथील योगेश ढिवरे व निलीमा (मुलीचे बदललेले नाव) यांनी लग्नासाठी विवाह नोंदणी कार्यालयात 29 नोव्हेंबर रोजी नोंदणी केली होती़ पण विवाहाबाबत कार्यवाहीसाठी कर्मचारी, तसेच अधिकारी यांनी अडचणी सांगून टाळाटाळ केली़ अखेर 27 रोजीनोंदणीनुसार कायदेशीररित्या दोघांचा विवाह झाला़ मात्र यादरम्यान तरूणाला मारहाण करत मुलीला घेवून नातेवाईक पसार झाल़े कार्यालयातील कर्मचा:यांनी मुलीच्या नातेवाईकांनी लग्नाची माहिती दिल्याने प्रकार घडल्याचा आरोप योगेश ढिवरे याने  जिल्हापेठ पोलिसात दिलेल्या तक्रारीद्वारे केला  आहे.
योगेश ढिवरे व निलिमा हे कुंझरचेच आहेत.  शाळेत असताना योगेशचे निलिमावर प्रेम होत़े  माध्यमिक शिक्षणानंतर दोघांनी पुढील शिक्षणासाठी चाळीसगावात येथील महाविद्यालयात प्रवेश घेतला़ योगेश तृतीय वर्ष कला शाखेत असून त्याच महाविद्यालयात निलिमा शिक्षण घेत आह़े   
लग्नासाठी योगेशच्या घरच्यांचा होकार होता मात्र निलिमाच्या कुटुंबियांकडून नकार होता़ अशात निलिमास मामाच्या गावी पाठविले.
दोघांनी घेतला लग्नाचा निर्णय
यातच योगेशने लग्नाचा निर्णय घेतला़ आत्याकडे यायचे असल्याचे सांगून निलीमा मामाचे गावाहून निघाली .  योगेशने सांगितल्याप्रमाणे ती नरडाणा येथे उतरली़ 29 नोव्हेंबर रोजी योगेश व निलीमा दोघांनी जिल्हाधिकारी कार्यालय गाठले व विवाह नोंदणीसाठी संबंधित कार्यालयात नोंदणी केली़ 25 फेब्रुवारीर्पयत केव्हाही लग्न करू शकतात असे कार्यालयाकडून सांगण्यात आल़े मात्र पाठपुरावा केला असता दुय्यम निबंधकाकडून टाळाटाळ केली जात होती असे योगेशचे म्हणणे आह़े योगेश निलीमासह काही दिवस मुंबईला राहिला़
मुलीला घेवून जाणा:या गाडीसमोर प्रियकर झोपला
 योगेश-निलीमा यांनी 27 रोजी सकाळी 11 वाजता  नोंदणी कार्यालय गाठल़े  कर्मचा:यांनी संगणकाची अडचण सांगितली. अधिका:याशी वाद झाल्यानंतर अखेर दुपारी विवाह पार पडला़ दोघांनी विवाह प्रमाणपत्रही घेतल़े यानंतर काही वेळातच निलीमाचे नातेवाईक जिल्हाधिकारी कार्यालयात आल़े  त्यांनी योगेशला  मारहाण केली़ योगेश मुलीला घेवून जात असलेल्या  जीपसमोर झोपला़  त्याला बाजूला करत निलीमाला घेवून नातेवाईक रवाना झाल़े त्यानंतर योगेशने जिल्हापेठ पोलीस स्टेशन गाठत तेथे तक्रार दिली, त्यानंतर तपासचक्र गतिमान झाली.
कुंजर येथील तरुण व तरुणीने  विवाहासाठी नोंदणी केली होती. बोर्डावर नोटीस लावल्यानंतर दोन तीन दिवसानंतर ही बाब मुलीच्या कुटुंबियांना समजली. मुलीच्या कुटुंबातील एक व्यक्ती लक्ष ठेवून होता.आमच्याकडे नातेवाईकांचे फोन नंबर नसतात. त्यामुळे आमच्या कार्यालयातील कर्मचा:याने नातेवाईकांना फोन केल्याचा आरोप चुकीचा आहे.
-संजय नाईक, प्रभारी विवाह अधिकारी, विशेष विवाह अधिकारी कार्यालय,


अमळनेर येथे सापडले वाहन
योगेश ढिवरे याने जिल्हापेठ  पोलिसात तक्रार दिली. एएसआय शिवाजी वराडे, करूणासागर जाधव यांनी वायरलेसवरून जिल्हाभरातील पोलीस ठाण्यांना संदेश दिला़ अमळनेरला निलीमासह तिचे नातेवाईक असलेली चारचाकी पोलिसांनी पकडली़ निलीमा बेपत्ता असल्याबाबत मारवड ता़अमळनेर पोलिसात नोंद असल्याने त्यांना मारवड पोलीस ठाण्यात नेण्यात आल़े तेथील पोलिसांनी जिल्हापेठ पोलिसांना निलीमा मिळाल्याची माहिती दिली़ त्यावरून योगेशसह त्याचे नातेवाईक मारवडकडे रवाना झाले होत़े

Web Title: Married after the marriage; Attempt to flee the girl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.