पतीबाबत चौकशी केल्याने विवाहितेला वडील व भावंडांकडून मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 09:20 PM2019-07-01T21:20:31+5:302019-07-01T21:21:04+5:30
एरंडोल येथील ूघटना
एरंडोल :- येथील आंतरजातीय विवाह केलेल्या मंजु दीपक परदेशी (वय ३८) ही विवाहीता तिच्या पती बाबत येथे वडिलांच्या घरी चौकशी करायला गेली असता तिला वडील व भावंडांकडून कुºहाडीने व लाथा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. त्यात ती गंभीर जखमी झाली.
या महिलेवर जळगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत जिल्हा पेठ पो. स्टे. कडून जखमी महिलेचा जवाब आल्यानंतर एरंडोल पो. स्टे. ला सोमवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला. मंजू परदेशी ही मुस्लिम समाजाची असून तिने हिंदू समाजाच्या मुलाशी विवाह केलेला आहे. सध्या ती धुळे येथे आपल्या परिवारासह कालिकादेवी नगरात वास्तव्यास आहे. विशेष हे की तिचे माहेर व सासर एरंडोल येथील आहे. ती वडिलांकडे तिच्या पतीच्या शोध घेण्यासाठी गेली असता त्याचे वाईट वाटून तिचे वडील अ. गफ्फार अ. रज्जाक यांनी तिला कुºहाड मारली त्यामुळे ती गंभीर जखमी झाली तसेच तिला तिचे भाऊ वसीम व रईस, नणंद शाहीन भावजाई शबु यांनीही मारहाण केली. ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार घेऊन पुढील उपचारासाठी तिला जळगाव सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याप्रकरणी एरंडोल पो.स्टे. ला भाग ५ गु.र.५३/०१९ भादवि कलम ३२४, १४३, १४७, १४९, १४८, ३२३, ५०४ याप्रमाणे गुन्हा दाखल आहे. पो.नि. अरुण हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप निरीक्षक हर्षल कुलकर्णी, श्रीराम पाटील, प्रदीप चांदेलकर, राहुल बैसाने हे तपास करीत आहे