भुसावळ एमआयडीसीत भीषण आग, तीन कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 04:10 PM2020-04-26T16:10:50+5:302020-04-26T16:10:56+5:30

दोन वाहने व इतर साहित्य जळून खाक

Massive fire at Bhusawal MID, loss of Rs 3 crore | भुसावळ एमआयडीसीत भीषण आग, तीन कोटींचे नुकसान

भुसावळ एमआयडीसीत भीषण आग, तीन कोटींचे नुकसान

Next


भुसावळ : तालुक्यातील खडका येथील एमआयडीसीमधील डिस्को एंटरप्राईजेस कंपनीला भिषण आग लागल्यामुळे सुमारे तीन कोटींचे नुकसान झाले. ही घटना रविवारी २६ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजेच्या सुमारास घडली. आग आटोक्यात आणण्यासाठी अग्नीशमन दलाचे पाच बंब व खाजगी टँकरने जवळपास चार तास प्रयत्न केले.
या घटनेबाबत वृत्त असे की, खडका एमआयडीसीमध्ये डिस्को इंटरप्राईजेस या कंपनीच्या परिसरात काही व्यक्तींनी वाळलेले गवत पेटविले होते. मात्र या गवताने लगेच आगीचे रुद्र रुप धारण केले. आग कंपनीत शिरली व कंपनीतील टीव्ही, खुच्या व फ्रीजचे स्टँड बनवीन्याचे मशीन आगीच्या भक्षस्थानी पडले. सुदैवाने लॉकडाऊन व संचारबंदीमुळे सदर कंपनी बंद होती. त्यामुळे कंपनी कामगार नसले तरी एकच वाचमन उपस्थित होता. त्यांने आगीसंदर्भात कंपनीचे मालक कन्हैयालाल मिलकीराम मकडिया यांना फोनवरुन माहिती दिली. त्यामुळे मालक व परिवारीतल सदस्य घटनास्थळी पोहचले.
दरम्यान धुराचे लोट मोठे असल्यामुळे दूरुनच आग लागल्याचे दिसून येत होते. खडका येथील पोलीस पाटील सुरतसिंग पाटील यांनी तालुका पोलिस स्टेशन व भुसावळ न.पा.च्या अग्नीशमन दलाला माहिती दिली व तेही घटनास्थळी पोहचले. त्यामुळे न.पा. अग्नीशमन दलाचे दोन, आयुध निर्माणी भुसावळ, दीपनगर व जामनेर नगर पालिका असे प्रत्येकी एक असे एकुण पाच बंब व सहा टँकर घटनास्थळी दाखल झाले. टँकर व बंब भरण्यासाठी परिसरातील सोहम पेपर मील व एस.पी. इंटरप्राईजेस येथून पाणी वाहण्यात येवून बंब भरुन आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी तब्बल चार तास प्रयत्न करण्यात आले. परिसरात पाणी जवळच उपलब्ध असल्यामुळे जवळच्या कंपनी किंवा गोडाऊनकडे आगीचा फैलाव झाला नाही. यामुळे इतर कंपन्यांचेही नुकसान झाले नाही.
दरम्यान, आ. संजय सावकारे यांना माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. ते येथे अडीच ते तीन तास थांबून होते. डीवायएसपी गजानन राठोड , पं.स.चे माजी सभापती सुनील महाजन, माजी उपसभापती मुरलीधर (गोलू) पाटील, तहसीदार दीपक धिवरे, तलाठी मिलिंद देवरे, तालुका पो.स्टे.चे पोलिस निरीक्षक रामकृष्ण कुंभार,स.पो.नि. अमोल पवार, पो.कॉं.विठ्ठल फुसे, अजय माळी हे देखील घटनास्थळी दाखल झाले. तर बाजारपेठ पोलिसांनीही आगीची भिषणता पाहुन घटनास्थळी भेट दिली.
दोन वाहने जळाली ला
या आगीत एक आयशर जळून खाक तर एका मालवाहतूक वाहनाचा काही भाग जळाला तर टीव्ही, खुर्च्या, फ्रिज स्टँड बनविण्याची मशीनरी व शेड जळून खाक झाल्यामुळे प्रचंड नुकसान झाले आहे. पंचनाना केल्यांनतर नुकसानीचा आकडा समजू शकेल. तालुका पोलिसात याबाबत मकडीया यांच्या फिर्यादी नंतर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.
धुरांच्या लोटमुळे ग्रामीण भागात चर्चा
कंपनीला लागलेली आग इतकी भिषण होती की, भुसावळसह तालुक्यातील कुºहे (पानाचे), चोरवड, गोजोरा, कन्हाळे, किन्ही, साक्री गावात धुराचे लोट दिसत होते. त्यामुळ ग्रामीण भागातही चर्चा सुरू होती.

Web Title: Massive fire at Bhusawal MID, loss of Rs 3 crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.