मुंबईतल्या मराठा क्रांती महामोर्चासाठी जळगावात भव्य दुचाकीरॅली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2017 01:49 PM2017-08-04T13:49:28+5:302017-08-04T13:49:58+5:30

जळगाव, दि. 4 - मुंबई येथे 9 ऑगस्ट रोजी मराठा क्रांतीचा महामोर्चा काढण्यात येणार आह़े या  पार्श्वभूमीवर शुक्रवारी जळगाव ...

A massive two-wheeler rally in Jalgaon for the Maratha Kranti Mahammumbai in Mumbai | मुंबईतल्या मराठा क्रांती महामोर्चासाठी जळगावात भव्य दुचाकीरॅली

मुंबईतल्या मराठा क्रांती महामोर्चासाठी जळगावात भव्य दुचाकीरॅली

Next

जळगाव, दि. 4 - मुंबई येथे 9 ऑगस्ट रोजी मराठा क्रांतीचा महामोर्चा काढण्यात येणार आह़े या  पार्श्वभूमीवर शुक्रवारी जळगाव शहरात क्रांती मोर्चातर्फे दुचाकीरॅली काढून जनजागृती करण्यात आली. रॅलीत पाचशेवर दुचाकीस्वार सहभागी झाल़े  भगवे ङोंडे हाती असलेल्या दुचाकीस्वारांनी लक्ष वेधले होते. 

काव्यरत्नावली चौक येथे सकाळी 10 वाजता जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्यवस्थापक जितेंद्र देशमुख यांच्याहस्ते हिरवी डोंडी दाखवून रॅलीचा शुभारंभ झाला़ यावेळी उद्योजक श्रीराम पाटील, किरण बच्छाव, बाळासाहेब सुर्यवंशी, जिल्हा परिषद सदस्य रवी देशमुख, डॉ़ राजेश पाटील, किरण साळुंखे, विनोद देशमुख, सुरेंद्र पाटील, राम पवार, सुदाम पाटील, विकास नरवाडे, प्रा़डी़डी़बच्छाव, दिपक सुर्यवंशी, विलास पाटील, अॅड़सचिन पाटील, अॅड़ सचिन चव्हाण, अॅड़ अनिल पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजेश पाटील, कृष्णा पाटील, सुरेश पाटील, प्रमोद पाटील, धनंजय पाटील, संजय सोनवणे, समीर जाधव, मल्हार जाधव आदी उपस्थित होते.

काव्यरत्नावली चौकातून रॅलीला सुरुवात झाली़ आकाशवाणी चौक, रिंगरोडमार्गे, आयएमआर कॉलेज, ख्वॉजामिया, कोर्ट चौक, नेहरु चौक, टॉवर, जुने बसस्टॅन्ड, शिवाजी चौक, मुख्य स्टेट बँक, स्वातंत्र्य चौकातून पुन्हा आकाशवाणी चौक, काव्यरत्नावली चौक येथे रॅलीचा समारोप झाला़

महामोर्चात मोठया संख्येने सहभागी व्हा
रॅलीचा समारोप झाल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी यांनी उपस्थितांना मुंबई येथील महामोर्चात मोठय़ा संख्येने सहभागी व्हा, असे आवाहन केले.

{{{{dailymotion_video_id####x8459m5}}}}

Web Title: A massive two-wheeler rally in Jalgaon for the Maratha Kranti Mahammumbai in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.