मास्टर लाईन फाऊंडेशनने स्वखर्चाने दिले २४ ऑक्सिजन बेड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:15 AM2021-04-18T04:15:28+5:302021-04-18T04:15:28+5:30
कजगाव ता.भडगाव: भडगाव येथील पाचोरा रोडवरील शासकीय कोविड सेंटरला मास्टर लाईन ऑइल कंपनीचे संचालक समीर जैन व सुयोग ...
कजगाव ता.भडगाव: भडगाव येथील पाचोरा रोडवरील शासकीय कोविड सेंटरला मास्टर लाईन ऑइल कंपनीचे संचालक समीर जैन व सुयोग जैन यांनी मास्टर लाईन फौंडेशनच्या ‘मास्टर लाईन कोविड केअर कक्ष’ च्या संकल्पनेतून २४ ऑक्सिजन बेड उपलब्ध करून दिले.
कोरोनाच्या गंभीर संसर्गजन्य रोगात नागरिकांचे हाल होऊ नये , म्हणून उचललेले हे पाऊल तालुक्यासाठी लाभदायक ठरेल, असे मास्टर लाईन कंपनीचे संचालक समीर जैन, सुयोग जैन यांनी सांगितले. भडगाव येथील शासकीय औद्योगिक वसाहतीच्या हॉलमध्ये १६ रोजी मास्टर लाईन कंपनीकडून देण्यात आलेल्या ऑक्सिजन बेडचे काम पूर्ण झाल्याने हे कोविड सेंटर सुरू करण्यात आले. सायंकाळी उद्घाटन सोहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खा. उन्मेष पाटील हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून आ. किशोर पाटील, उपविभागीय अधिकारी राजेंद्र कचरे, समीर जैन , सुयोग जैन , तहसीलदार सागर ढवळे , डॉ. पंकज जाधव , डॉ. प्रतीक भोसले , मुख्याधिकारी विकास नवाळे, पोलीस उपनिरीक्षक आनंद पटारे, डॉ. भूषण मगर ,मनोज सिसोदिया, शैलेश तोतला, सुरेश भंडारी, सुभाष राका उपस्थित होते. यावेळी समीर जैन व सुयोग जैन यांचा प्रशासनाच्या वतीने सत्कार करण्यात आला. (वा.प्र.)
-----
फोटो कॅप्शन: मास्टर लाईन कोविड केअर कक्ष लोकार्पणप्रसंगी खा. उन्मेष पाटील, आ.किशोर पाटील, राजेंद्र कचरे, सागर ढवळे, समीर जैन आदी.