व्हिडीओ चित्रण करणाऱ्या पत्रकाराचा कॅमेरा लांबविणारा माया, नाकतोड्या जेरबंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:17 AM2021-03-31T04:17:08+5:302021-03-31T04:17:08+5:30

जळगाव : फळ गल्लीत लाॅकडाऊनचे चित्रीकरण करत असताना अल्ताफ इस्माईल शेख (वय ३०, रा. मेहरुण) या पत्रकाराचा कॅमेरा व ...

Maya holding the camera of the journalist who filmed the video, nodding | व्हिडीओ चित्रण करणाऱ्या पत्रकाराचा कॅमेरा लांबविणारा माया, नाकतोड्या जेरबंद

व्हिडीओ चित्रण करणाऱ्या पत्रकाराचा कॅमेरा लांबविणारा माया, नाकतोड्या जेरबंद

Next

जळगाव : फळ गल्लीत लाॅकडाऊनचे चित्रीकरण करत असताना अल्ताफ इस्माईल शेख (वय ३०, रा. मेहरुण) या पत्रकाराचा कॅमेरा व मोबाइल लांबविणारा आकाश ऊर्फ नाकतोडा संजय मराठे (वय २१,रा. चौघुले प्लॉट), कल्पेश ऊर्फ बाळू देवीदास शिंपी याच्यासह छोटा माया या अल्पवयीन चोरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी जेरबंद केले.

त्यांच्याकडून चोरी केलेला कॅमेरा, मोबाइल व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत करण्यात आली. फुले मार्केट परिसरात फळ गल्लीच्या वळणावर सोमवारी अल्ताफ शेख लॉकडाऊनचे चित्रीकरण करीत होते. त्यावेळी दुचाकीवरून (क्र.एम.एच १९ सी.डी ३३१३) आलेल्या तिघांनी मोबाइल व कॅमेरा लांबविला होता. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दरम्यान, घटना पोलीस दलाच्या नेत्रम सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली होती. पोलिसांनी हे फुटेज ताब्यात घेतले असता यात छोटा माया, नाकतोड्या व त्याचा साथीदार असल्याचे समजले. पथकाने तत्काळ तपासचक्रे फिरवीत प्रजातप नगरातून संशयितांना ताब्यात घेतले.

स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांच्या मार्गदर्शनाखाली विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, प्रितम पाटील, नितीन बाविस्कर, राहुल पाटील, नंदलाल पाटील, भगवान पाटील यांच्या पथकाने अवघ्या काही तासातच गुन्ह्याचा छडा लावला. नेत्रमचे अंमलदार मुबारक देशमुख व हेमंत न्हायदे यांची यात मोलाची मदत झाली.

Web Title: Maya holding the camera of the journalist who filmed the video, nodding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.