यावल नगराध्यक्ष,मुख्याधिका:यांना रॉकेल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
By admin | Published: February 4, 2016 01:06 AM2016-02-04T01:06:13+5:302016-02-04T01:06:13+5:30
अतिक्रमण हटाव मोहीमेतील घटना: बाळासाहेब शिर्केसह मुलगा अटकेत
यावल : आपले अतिक्रमित दुकान काढू नये, म्हणून माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिर्के व त्यांचा मुलगा विशाल शिर्के यांनी नगराध्यक्ष अतुल पाटील व मुख्याधिकारी सोमनाथ आढाव यांच्या दिशेने कॅनमधील रॉकेल फेकले. त्यांना पेटविण्याचा प्रयत्न करीत असतांना पोलिसांनी प्रसंगावधान राखत शिर्के पिता-पुत्रास अटक केली आहे. यावल येथे आज बुधवारी अतिक्रमण हटाव मोहिम राबविण्यात आली. त्यावेळी बोरावल गेटजवळ हा प्रकार घडला. नगराध्यक्ष पाटील, पोलीस निरीक्षक सतीश वाघ व नगरसेवक हे जेसीबी चालकांना सूचना देत होते. त्यावेळी माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिर्के व त्यांचा मुलगा विशाल शिर्के यांनी आपले अतिक्रमित दुकान काढू नका दुकान कसे काढता? तुम्हाला आम्ही बघून घेऊ.. असे म्हणत बाळासाहेब शिर्के यांनी त्यांच्याजवळील कॅनमधील रॉकेल नगराध्यक्ष पाटील व माङया अंगावर टाकले तर विशाल याने आगपेटीतील काडी पेटविली. त्याचवेळी समोर असलेल्या पोलिसांना या दोघांवर झडप घालून ताब्यात घेतले. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. याबाबत आढाव यांच्या फिर्यादीवरुन यावल पोलिसात भादंवि कलम 307, 353, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा नोंद आहे. शहर विकासासाठी अशा हल्ल्यांना भिक घालणार नाही. शिर्के व त्यांच्या प - अतुल पाटील, नगराध्यक्ष,यावल.