इकरा कोविड केअर सेंटरची महापौरांनी केली पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:16 AM2021-03-25T04:16:07+5:302021-03-25T04:16:07+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव - शहरातील इकरा एज्युकेशन सोसायटीच्या कोविड केअर सेंटरची बुधवारी महापौर जयश्री महाजन यांनी पाहणी केली. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव - शहरातील इकरा एज्युकेशन सोसायटीच्या कोविड केअर सेंटरची बुधवारी महापौर जयश्री महाजन यांनी पाहणी केली. महापौरांनी डॉक्टर आणि रुग्णांशी चर्चा केली. साफसफाई व जेवणाच्या दर्जाबाबत तक्रारी आल्याने त्या सोडविण्याच्या सूचना महापौरांनी केल्या. यावेळी डॉ. विजय घोलप आणि इतर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
इकराच्या कोविड सेंटरमध्ये कोरोनाचे रुग्ण दररोज दाखल होत असून, आणखी बेड वाढविण्यात आले आहेत. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता मनुष्यबळ कमी पडत असून, ते वाढविण्यासाठी मनपा आयुक्तांशी चर्चा करणार असल्याचे महापौर जयश्री सोनवणे यांनी सांगितले. त्यांनी ऑक्सिजन पुरवठ्याचादेखील आढावा घेतला. महापौर जयश्री महाजन यांनी कोविड रुग्णांशी चर्चा करून माहिती जाणून घेतली असता साफसफाई आणि जेवणाबाबत रुग्णांनी तक्रार केली. महापौरांनी याबाबत सूचना देत तात्काळ योग्य ती सुधारणा करण्याचे सांगितले.