शिवकॉलनीतील रस्त्यांच्या कामाची महापौरांकडून पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 6, 2021 04:17 AM2021-05-06T04:17:36+5:302021-05-06T04:17:36+5:30
जळगाव - शहरात रस्त्यांच्या डागडुजीचे काम सुरू असून कामाची गुणवत्ता आणि दर्जा तपासण्यासाठी महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण ...
जळगाव - शहरात रस्त्यांच्या डागडुजीचे काम सुरू असून कामाची गुणवत्ता आणि दर्जा तपासण्यासाठी महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी बुधवारी शिवकॉलनी आणि दत्त कॉलनीत पाहणी केली. कामाबाबत यावेळी त्यांनी मनपा अधिकाऱ्यांना सूचना केल्या. बुधवारी महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी कामाची प्रत्यक्षात पाहणी केली. यावेळी शहर अभियंता अरविंद भोसले, नगरसेवक प्रा.डॉ.सचिन पाटील, अभियंता योगेश वाणी, प्रभाग अधिकारी विलास सोनवणे व नागरिक उपस्थित होते.
दाणाबाजारात लहान वाहनांना मिळणार प्रवेश
जळगाव -सध्या सुरू असणाऱ्या कडक निर्बंधांच्या कालावधीत दाणा बाजारात लहान चारचाकी वाहनांना प्र्रवेश देण्यात आला असून उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी व्यापाऱ्यांसोबतच्या बैठकीत त्यांच्या मागणीवरून हा निर्णय घेतला आहे. तसेच अवजड वाहनांसाठी जुन्या नगरपालिकेच्या जागेवर व्यवस्था करण्यात आली आहे. बुधवारी व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत उपमहापौर यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. यात व्यापाऱ्यांनी लहान वाहनांना दाणा बाजारात प्रवेश मिळावा, अशी मागणी केली. उपमहापौर पाटील यांनी यानुसार उपायुक्तांशी चर्चा केल्यानंतर ही मागणी मान्य करण्यात आली. यामुळे आता दाणा बाजारात लहान चारकाची वाहने जाऊ शकणार आहेत.
घरकुल घोटाळ्यातील पाच नगरसेवकांना अपात्र करा
जळगाव - महानगरपालिकेत सत्तांतर हाेऊन दीड महिना उलटला असून शिवसेनेकडून भाजपाची काेंडी करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. भाजपाच्या पाचही नगरसेवकांना घरकूल घाेटाळ्यात शिक्षा झाली असून त्यांना अपात्र करण्याचा ठराव येत्या महासभेत करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्ताव अजेंड्यावर येण्यात आला आहे.
भाजपाचे गटनेते भगत बालाणी, सदाशिव ढेकळे, लता भाेईटे, दत्तात्रय काेळी व स्वीकृत नगरसेवक कैलास साेनवणे यांना घरकूल घाेटाळ्यात न्यायालयाने दाेन वर्षापेक्षा जास्त शिक्षा ठाेठावली आहे. असे असतानाही पाचही नगरसेवक सभागृहात आहेत. त्यामुळे नुकतेच शिवसेनेच्या गाेटात दाखल झालेले नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी १२ मे राेजी हाेणाऱ्या महासभेत प्रस्ताव सादर केला आहे.क