सभा ऑफलाईन होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:16 AM2021-03-15T04:16:19+5:302021-03-15T07:14:00+5:30

नगरसेवकांकडून पक्षातील काही धोरणांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये कार्यक्रमांमध्ये पक्षातील बैठकांमध्ये बोलाविले जात नाही. विश्वासात घेतले जात नाही. ...

Mayor News Add ... | सभा ऑफलाईन होणार

सभा ऑफलाईन होणार

Next

नगरसेवकांकडून पक्षातील काही धोरणांबाबत नाराजी व्यक्त केली आहे. यामध्ये कार्यक्रमांमध्ये पक्षातील बैठकांमध्ये बोलाविले जात नाही. विश्वासात घेतले जात नाही. विकास कामांमध्ये दुजाभाव होतो. तसेच आमदार सुरेश भोळे व महापौर भारती सोनवणे यांच्यावर नगरसेवकांची नाराजी असल्याचे सांगितले जात आहे.

सभा ऑफलाईन होणार

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मनपा महासभा ही ऑनलाईन पध्दतीने घेतली जात होती. मात्र, जिल्हाधिकाऱ्यांकडून रविवारी काढण्यात आलेल्या आदेशात महासभेत उपस्थितीच्या मर्यादेत सवलत दिली आहे.

४ दिवसांपूर्वी मिळाला मुंबईहून ग्रीन सिग्नल

जळगाव मनपातील भाजपात गटबाजी निर्माण झालेली होती. चार गट उघडपणे वावरताना दिसत होते. या गटबाजीला पद्धतशीर खतपाणी घालण्याचे काम स्थानिक सेना नेत्यांकडून सुरू होते. मात्र राष्ट्रवादीने सांगली पॅटर्न यशस्वीपणे राबविल्यानंतर जळगावातही हा पॅटर्न राबविण्याच्या हालचाली सुरू झाल्या. याबाबत जळगावातून शिवसेनेचे मनपातील विरोधी पक्षनेते सुनील महाजन हे पालकमंत्र्यांच्या संपर्कात होते. मुंबईहून चार दिवसांपूर्वी ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ला ग्रीन सिग्नल मिळाला. त्यानंतर हालचालींना वेग आल्याची चर्चा आहे. तर ललित कोल्हे यांचे घनिष्ठ संबंध असलेल्या एका खासदारांच्या मार्फत याबाबत हालचाली सुरू झाल्या. त्यानंतर मातोश्रीवरून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत लक्ष घालण्याच्या सूचना मिळाल्या. त्यांनी भाजपच्या नगरसेवकांना सर्व जबाबदारी घेण्याचे आश्वासन दिल्यानंतरच पुढील घडामोडी गतीने घडल्याचीही चर्चा आहे.

गुप्तता पाळत राबविले ऑपरेशन

हे ‘ऑपरेशन धनुष्यबाण’ राबविताना अत्यंत गुप्तता पाळली गेली. जळगावातील स्थानिक नेत्यांनाही त्याबाबत माहिती नसल्याचे समजते. भाजपाचे संकटमोचक व सत्तेची गणित जमविण्यात तरबेज अशी ओळख राज्यात असलेल्या आ. गिरीश महाजन यांच्याच हातातील महापालिका हिसकावण्याचे हे ऑपरेशन अवघड होते. मात्र त्यात सेनेला बऱ्यापैकी यश मिळाल्याची चर्चा असली तरीही प्रत्यक्ष निवडीपर्यंत धाकधूक कायम आहे.

सभागृहनेत्यांनीही सोडली भाजपची साथ

भाजपाचे मनपातील सभागृहनेते ललित कोल्हे यांनीदेखील भाजपची साथ सोडल्याचे ‘लोकमत’ला सांगितले. बहुमतासाठी ३९ सदस्य लागत असताना दुपारपर्यंत सेनेकडे एमआयएमच्या ३ सदस्यांसह ही सदस्यसंख्या जमली होती. रात्री ललित कोल्हे यांच्यासह चौघेही येऊन मिळाल्याने ही संख्या ४४ वर गेल्याचे सांगितले जात आहे. तसेच सेनेचा महापौर निश्चित असल्याचा दावा केला जात आहे.

Web Title: Mayor News Add ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.