महापौरांनी हात झटकले

By admin | Published: February 10, 2017 12:40 AM2017-02-10T00:40:55+5:302017-02-10T00:40:55+5:30

समांतर रस्ते कृती समिती सोबत तासभर चर्चा :

The mayor shook hands | महापौरांनी हात झटकले

महापौरांनी हात झटकले

Next


जळगाव : समांतर रस्त्यांची जागा महापालिकेच्या ताब्यात नाही, आणि ताबा मिळाला तरी आर्थिक परिस्थितीमुळे हे काम करणे अशक्यच आहे तसेच महामार्गावरील अतिक्रमणे हटविण्याची जबाबदारीही मनपाची नव्हे तर महामार्ग प्राधिकरणाची असल्याचे स्पष्ट करीत महापौर नितीन लढ्ढा यांनी हात झटकले. त्यामुळे समातंर कृती समितीसह जळगावकरांचा पुरता भ्रमनिरास झाला.
तांत्रिक स्वरूपाची जी काही मदत असेल ती मनपा करेल. त्यासाठी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यामार्फत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करणे हाच पर्याय असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. समांतर रस्ते कृती समितीने गुरूवारी दुपारी 12 वाजता महापौर नितीन लढ्ढा यांच्या दालनात रस्त्याच्या कामासंदर्भात त्यांच्याशी तब्बल तासभर चर्चा केली. यावेळी त्यांनी हतबलता व्यक्त केली.
अनेक सदस्यांची उपस्थिती
चर्चेदरम्यान, डॉ. राधेश्याम चौधरी,  नगरसेवक कैलास सोनवणे, गजानन मालपुरे, नगरसेवक अनंत जोशी, विनोद देशमुख, फारूक शेख, दिलीप तिवारी, विराज कावडिया, अमित जगताप, मितेश गुजर, सरिता माळी, भुषण सोनवणे, पियुश पाटील, अजिंक्य देसाई, तेजस्विनी महाजन, मंगला बारी, मुविकोराज कोल्हे यांच्यासह अन्य सदस्यांनी चर्चेत सहभाग घेतला.

जमीन मनपाच्या ताब्यात नाही
महामार्गालगतचे अतिक्रमण काढण्याची जबाबदारी ही ‘नही’ची आहे. जिल्हाधिका:यांकडे बैठक झाली त्यावेळी मनपाने अतिक्रमणे काढण्यासाठी मनुष्यबळ देण्याचे व पोलीस अधीक्षकांनी बंदोबस्त देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र पुढाकार हा प्राधिकरणालाच घ्यावा लागेल. सध्याचा रस्ता बळकटीकरण व समांतर रस्त्याचे काम सुरू केले तरी मनपाचा कोणताही अडथळा नसेल. कोणतीही जमीन ही मनपाच्या ताब्यात नाही. तशी अडचण आलीच तरी आम्ही तसे हमीपत्र देऊ व जागेचा ताबा तत्काळ देऊ, असेही लढ्ढा यांनी स्पष्ट केले.

 चुकीच्या माहितीवरुन प्रतिज्ञापत्र दिले..
कृती समितीच्या सदस्यांनी मांडलेल्या  विषयांना उत्तर देताना महापौर नितीन लढ्ढा म्हणाले, महामार्ग प्राधिकरणाच्या जागेवर काहीही करण्याचा मनपास अधिकार नाही. मनपा समांतर रस्ते करू शकत नाही. यात अनेक बाबी तांत्रिकदृष्टया गुंतागुंतीच्या आहेत. तत्कालीन आयुक्त प्रकाश बोखड यांनी उच्च न्यायालयात समांतर रस्त्याप्रकरणी चुकीच्या माहितीवरून प्रतिज्ञापत्र दिले आहे. मनपाने नंतर ते पत्र मागे घेऊन समांतर रस्ते करू शकत नाही असेही न्यायालयास कळविले आहे. याची कागदपत्रेही त्यांनी यावेळी सदस्यांना दाखविली.
गडकरींकडे पाठपुरावा करु
कृती समितीच्या माध्यमातून चांगले व्यासपीठ निर्माण झाले आहे. सर्व मिळून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा करून  काम सुरू करण्याबाबचे आदेश देण्याची मागणी करू असे लढ्ढा यांनी स्पष्ट केले. यावेळी उपमहापौर ललित कोल्हे, उपायुक्त लक्ष्मीकांत कहार, अभियंता सुनील भोळे, भास्कर भोळे उपस्थित होते.

 

 

Web Title: The mayor shook hands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.