महापौरांनी धरले अधिकाऱ्यांना धारेवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:37 PM2019-01-30T12:37:11+5:302019-01-30T12:37:16+5:30
प्रभाग अधिकाºयांना द्यावा लागेल आठवड्याचा अहवाल
जळगाव : शहरातील नागरिकांच्या समस्या सोडविण्याची जबाबदारी केवळ नगरसेवकांची नसून, अधिकाºयाची देखील आहे. मात्र, मनपाच्या अधिकाºयांकडून कोणतीही जबाबदारी व्यवस्थितरित्या पार पाडली जात नसल्याचे सांगून महापौरांनी मनपा अधिकाºयांना धारेवर धरले.
सर्व प्रभाग अधिकाºयांनी नागरिकांच्या समस्यांचा तक्रारीचा अहवाल प्रत्येक आठवड्यात महापौर व उपमहापौरांकडे सादर करण्याचा सूचना आमदार सुरेश भोळे यांनी मनपाच्या अधिकाºयांना दिल्या.
मनपाच्या दुसºया मजल्यावरील सभागृहात मंगळवारी महापौर सीमा भोळे, आमदार सुरेश भोळे, उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे, स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे, मनपा गटनेते भगत बालानी यांनी मनपाच्या सर्व विभागाच्या अधिकाºयांची आढावा बैठक घेतली. या बैठकीत आमदार सुरेश भोळे बोलत होते. या बैठकीला उपायुक्त चंद्रकांत खोसे यांच्यासह भाजपा व शिवसेनेचे काही नगरसेवक देखील उपस्थित होते.
पाणी पुरवठा नियोजनाबाबत खोटी माहिती देवू नका
मनपाच्या पाणी पुरवठा विभागाच्या अभियंत्यांकडून शहरात तीन दिवसाआड पाणी पुरवठा करण्याबाबत परस्पर घोषणा केली जात असून, या मुद्यावरून आमदार भोळे यांनी शहर अभियंता डी.एस.खडके यांना चांगलेच धारेवर धरले. वाघूर धरणाकडून येणाºया पाईपलाईन मधील गळत्यांमुळे लाखो लिटर पाणी वाया जात असताना त्या संबधी नियोजन न करता खोटी माहिती का देतात ? याबाबत देखील आमदारांनी खडकेंनाजाब विचारला. आधी वाघूर धरणाचा जलसाठ्याचा अभ्यास करा त्यानंतरच किती दिवसाआड पाणी पुरवठा करावा यासंबधीचे वक्तव्य करा असेही सांगितले.
हेल्पलाईनवरील एकही तक्रार प्रलंबित असता कामा नये
मनपाच्या हेल्पलाईनवर वर्षभरापासून तब्बल १४०० तक्रारी प्रलंबित असून, या तक्रारींचा निपटारा होत नसल्याने आमदार भोळे यांनी चारही प्रभाग अधिकाºयांना चांगलेच धारेवर धरले.
कंत्राटी भरतीबाबत धुळे मनपाकडून माहिती घ्या
यावेळी अधिकाºयांनी देखील आमदारांकडे आपल्या अडचणी मांडल्या. मनपातील अनेक पदे रिक्त असल्याने मनपात काम करताना अडचणी येत असल्याची तक्रारी अधिकाºयांनी मांडली. त्यावर शासनाकडे दिलेला आकृतीबंद मंजूर व्हावा यासाठी आपण शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याची माहिती आमदार भोळे यांनी दिली. तसेच हा आकृतीबंद मंजूर होईपर्यंत मनपातील रिक्त जागा या कंत्राटी पध्दतीने भरण्यात येतील, यासाठी धुळे व मालेगाव महापालिकेकडून माहिती घेण्यात यावी अशाही सूचना आमदारांनी दिल्या.
सफाई कर्मचारी दारु पिवून कचरा उचलतात-नेरकर
1 सफाई कर्मचारी कचरा संकलन करताना दारु पिवून येत असल्याची धक्कादायक माहिती भाजपाच्या नगरसेविका सरीता नेरकर यांनी या बैठकीत दिली. मात्र,याबाबत आरोग्य अधिकाºयांकडे तक्रार केले असता, त्यांनी सफाई कर्मचाºयावर कारवाई न करता यामध्ये राजकारण असल्याचे उत्तर दिल्याची माहिती नेरकर यांनी दिली.
2 त्यावर देखील उपमहापौर डॉ.अश्विन सोनवणे यांनी मपना आरोग्य अधिकारी उदय पाटील यांच्याकडून खुलासा मागितला. तसेच ज्या अधिकाºयांना राजकारण करायचे असेल त्यांनी आमच्या पक्षात यावे असा टोला देखील आमदार सुरेश भोळे यांनी अधिकाºयांना लगावला. ज्या भागात सफाई कर्मचाºयांकडून कचरा उचलला जात नसेल त्यांच्यावर दंडाची कारवाई करण्याचा सूचना उपमहापौरांनी दिल्या.