पहाटे ५ वाजताच महापौरांची एलईडी पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:37 AM2021-01-13T04:37:02+5:302021-01-13T04:37:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव -मनपाकडून गेल्या महिनाभरापासून एलईडी बसविण्याचे काम सुरु आहे. एस्को तत्वावर शहरात १७ हजार एलईडी बसविण्यात ...

Mayor's LED inspection at 5 am | पहाटे ५ वाजताच महापौरांची एलईडी पाहणी

पहाटे ५ वाजताच महापौरांची एलईडी पाहणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव -मनपाकडून गेल्या महिनाभरापासून एलईडी बसविण्याचे काम सुरु आहे. एस्को तत्वावर शहरात १७ हजार एलईडी बसविण्यात येणार असून, अनेक भागात एलईडी बसविण्यात आले आहेत. गेल्याच आठवड्यात मोहाडी रस्त्यावर एलईडी बसविण्यात आले होते. या कामाची पाहणी करण्यासाठी रविवारी पहाटे ५ वाजताच महापौर भारती सोनवणे यांनी एलईडी सुरू आहेत की नाही याची पाहणी केली. या भागात सर्वच पथदिवे सुरु असल्याचे आढळून, यावेळी सकाळी पायी फिरण्यासाठी आलेल्या नागरिकांशी देखील त्यांनी संवाद साधला.

शहरात सध्या एलईडी पथदिवे बसविण्याचे काम सुरू आहे. शहराला नवीन झळाळी मिळत असून वीज बचत देखील होणार आहे. रविवारी सकाळी ५ वाजताच महापौर भारती सोनवणे यांनी मोहाडी रोड परिसरात फेरफटका मारत पाहणी केली. सर्व एलईडी बसविण्याचे काम पूर्ण झाले असून रस्त्यावर लख्ख प्रकाश पडला असल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले. मोहाडी रोड परिसरात सकाळी पायी फिरण्यासाठी आलेल्या महिलांशी देखील महापौरांनी यांनी संवाद साधला. उजेड वाढल्याने रस्त्यावर होणाऱ्या सोनसाखळी लंपासच्या प्रकाराला आळा बसणार असून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत होणारे गैरप्रकार देखील रोखले जाणार असल्याने महिलांनी समाधान व्यक्त केले.

दरम्यान, परिसरात आणि शहरात अमृत योजनेमुळे रस्त्यांची दुरवस्था झालेली असल्याने प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार नागरिकांनी महापौरांकडे केली. लवकरात लवकर रस्ते दुरुस्ती करण्याची मागणी देखील नागरिकांनी केली. रस्ते दुरुस्तीसाठी प्रत्येक प्रभागाचा मक्ता दिलेला असल्याची माहिती महापौरांनी सांगितले. दरम्यान, शहरात अशाप्रकारे कामांच्या पाहणीसाठी महापौर अचानक पाहणी करणार असून, यामध्ये एलईडी, सफाईच्या कामांसह रस्ते दुरुस्तीच्या कामाचीही तपासणी केली जाणार आहे.

Web Title: Mayor's LED inspection at 5 am

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.