अमळनेरात शेतकरी कृती समितीतर्फे ठिय्या
By Admin | Published: June 5, 2017 01:21 PM2017-06-05T13:21:50+5:302017-06-05T13:21:50+5:30
अमळनेर तहसीलदारांना दिले निवेदन
ऑनलाईन लोकमत
अमळनेर,दि.5 : शेतक:यांची कर्जमाफी झाली पाहिजे, वीजबिल माफ झाले पाहिजे, शेतक:यांना पेन्शन योजना लागू करावी आदी मागणीसाठी शेतकरी कृती समितीतर्फे आज सकाळी 10 वाजता तहसील कार्यालयाच्या आवारात ठिय्या आंदोलन करण्यात आले. अवघे 10-15 मिनीटे हे आंदोलन सुरू होते. त्यानंतर तहसीलदार प्रदीप पाटील यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
शेतकरी कृती समितीनेही शेतक:यांच्या मागण्यासंदर्भात सोमवारी सकाळी तहसील कार्यालयाच्या आवारातच ठिय्या आंदोलन केले होते. यामुळे प्रशासनाची धावपळ उडाली. अखेर आंदोलकांनी 15 मिनीटानंतर तहसीलदारांना निवेदन दिले. यावेळी शिवाजी दौलत पाटील, संजय पुनाजी पाटील, धनगर पाटील, गोकूळ बोरसे, मिलिंद बोरसे, गिरीश पाटील, राजेंद्र पवार, रवींद्र पाटील, गोपाळ पाटील, सुरेश पाटील,लक्ष्मण शिंदे, प्रदीप पाटील, नरेंद्र बाळू पाटील, सागर शिंदे, सुरेश पाटील, दिनेश पाटील आदी उपस्थित होते.