भुसावळात शिवसेनेचे ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 09:23 PM2018-09-18T21:23:51+5:302018-09-18T21:25:27+5:30
शासनाच्या रेशन दुकानांवरी अनागोंदी कारभार थांबवून सर्वसामान्य गरीब,गरजू रेशनकार्डधारकांना सणासुदीच्या काळात पुरेसा धान्य कोटा देण्याच्या मागणीसाठी शिवसेनेतर्फे मंगळवारी १८ रोजी तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
Next
ठळक मुद्देरेशनमधील अनागोंदीचा केला निषेधतहसीलदारांना कारवाईबाबत निवेदन सादरलाभार्थ्यांना दिली जातात उडवाउडवीची उत्तरे
भुसावळ : शासनाच्या रेशन दुकानांवरी अनागोंदी कारभार थांबवून सर्वसामान्य गरीब,गरजू रेशनकार्डधारकांना सणासुदीच्या काळात पुरेसा धान्य कोटा देण्याच्या मागणीसाठी शिवसेनेतर्फे मंगळवारी १८ रोजी तहसीलदार कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या दरम्यान, तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन सोपवून कारवाईची मागणी करण्यात आली.
जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील, उपजिल्हा संघटक विलास मुळे, तालुका प्रमुख समाधान महाजन, विधानसभा क्षेत्र प्रमुख संतोष सोनवणे, उपतालुका प्रमुख पप्पू बारसे व सहयोगी संघटना यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला.