अमळनेर तालुक्यात तीन जिनिंगमध्ये कापूस खरेदीसाठी मोजमाप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 03:50 PM2020-12-26T15:50:22+5:302020-12-26T15:53:29+5:30
अमळनेर तालुक्यात तीन जिनिंगमध्ये कापूस खरेदीसाठी मोजमाप सुरू राहील, अशी ग्वाही आमदार अनिल पाटील यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : तालुक्यात तीन जिनिंगमध्ये कापूस खरेदीसाठी मोजमाप सुरू राहील, अशी ग्वाही आमदार अनिल पाटील यांनी येथील कापूस खरेदी केंद्राच्या शुभारंभप्रसंगी दिली.
यावेळी पणन संचालक संजय पवार माजी आमदार स्मिता वाघ, पणन माजी संचालिका तिलोत्तमा पाटील, जि. प. सदस्या जयश्री पाटील, अनिल शिसोदे, पं. स. माजी सभापती शाम अहिरे, माजी पणन संचालक सुभाष चौधरी, सहाय्यक निबंधक गुलाबराब पाटील, लामा जिनर्सचे विनोद कोठारी विभागीय व्यवस्थापक ए. के. गिरमे, उपव्यवस्थापक आर. जी. होले, बाजार समिती सचिव उन्मेष राठोड, बाळासाहेब सिसोदे, यतीन कोठारी, केंद्रप्रमुख अनिल कदम उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन संजय पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन बाळासाहेब शिसोदे यांनी केले.
कापूस पणन महासंघाचे निवृत्त कर्मचारी ए. बी. निकम यांनी माहिती दिली. संजय पवार-लामा जिनिंगमध्ये गेल्यावर्षी शुभारंभ करताना स्व. उदय वाघ यांची आठवण आली व कापूस खरेदीबाबत उदय वाघ यांचा पहिला फोन आला होता. या आठवणींना उजाळा दिला. खरेदी १५ दिवस उशिरा झाल्याने दिलगिरी व्यक्त केली. केवळ अजित पवारांच्या माध्यमातून आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नाने हे केंद्र सुरू झाले. त्याबद्दल पणन संचालक संजय पवार यांनी आभार व्यक्त केले. कापसाच्या प्रतवारीमुळे कापूस प्रत खराब झाली. त्यासाठी वाढीव १ हजार रुपये बोनस मिळवून देण्यासाठी पणन महासंघाच्या वार्षिक सभेत मागणी केली होती. तत्कालीन आमदार गिरीश महाजन यांनी १ महिना उपोषण करत कापसाला ७ हजार क्विंटल भावाची मागणी केली होती. ते पुढे मंत्री झाले, मात्र पुढे भावाबद्दल काही झाले नाही.
यावेळी संजय पवार यांनी पणन महासंघात विदर्भाचा प्रभाव असल्याने अजित पवार यांच्याकडे पणन महासंघाच्या मागण्या मांडा. ग्रेडर संख्या ६० आहेत. कापूस खरेदी केंद्रांसाठी केंद्रप्रमुख ग्रेडर नियुक्ती करा. १ हजार रुपये बोनस मिळावा, अशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करा. सध्या खान्देशात खरेदी विक्री केंद्राची दुरवस्था आहे. त्यामध्ये ऊर्जितावस्थेत आणावी अशा मागण्या केल्या. यावेळी प्रा. गणेश पवार यांनी मागण्या केल्या. स्मिता वाघ यांनीही मनोगत व्यक्त केले. कापूसचे तीन ठिकाणी मोजमाप होईल. दररोज १५० वाहने मोजमाप करण्यात येतील.