भाजीपाला विक्रीत मापात पाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2017 01:06 AM2017-02-20T01:06:53+5:302017-02-20T01:06:53+5:30

ग्राहकांची लूट : इलेक्ट्रॉनिक व प्रमाणित काटय़ांना खो : वजनमापे विभागाची बेफिकिरी

The measurement in the sale of vegetables is sin | भाजीपाला विक्रीत मापात पाप

भाजीपाला विक्रीत मापात पाप

Next

भुसावळ : इलेक्ट्रॉनिक व प्रमाणित वजनकाटय़ांना खो देत शहरातील भाजीबाजारात काही विक्रेत्यांनी मापात पाप सुरू केल्याची बाब लोकमतने रविवारी केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये उघड झाली आह़े
रविवारच्या आठवडे बाजारात शेकडो विक्रेते शहर व तालुक्यातून येथे दाखल होत असले तरी काही विक्रेते मात्र वजनांऐवजी दगड-गोटय़ांचा वर्षानुवर्षे वापर करत असल्याची बाब दिसून आली. शिवाय एक किलो भाजीपाला घेतल्यानंतरही प्रत्यक्षात तो 800 ग्रॅमच भरत असल्याचेही दिसून आल़े
भाजीपाल्याच्या मापात पाप
जंक्शन शहरात दर रविवारी जामनेर रस्त्यावर आठवडे बाजार भरतो़ त्यासाठी जिल्हाभरातील विविध भागातून सुमारे हजारावर व्यावसायिक भाजीपाला विक्रीसाठी येतात़ इलेक्ट्रॉनिक काटे तर सोडा, पारंपरिक काटय़ांमध्ये दगड-गोटय़ांचाच वजन म्हणून वापर केला जात असल्याचे चित्र दिसून आल़े
प्रमाणित वजनकाटे वापरण्याचा नियम असतानाही शहरातील काही भाजीपाला व्यावसायिकांनी नियम धाब्यावर बसवले आहेत़ कारवाई करण्याची जबाबदारी वजनमापे निरीक्षकांची असली तरी त्यांची भूमिकाही आलबेल अशीच आह़े भुसावळात त्यांनी धडक कारवाई केल्याचे ऐकीवात नाही़ त्यांच्या बेफिकिरीने मात्र शासनाचे मोठे आर्थिक नुकसान होत आह़े
4भुसावळात रविवारी भरणा:या आठवडे बाजाराचा विचार केल्यास किमान एक हजारावर भाजीपाला व्यावसायिक येतात़ त्यातील अनेक व्यावसायिकांकडे प्रमाणित वजनकाटे तर सोडा वजनेदेखील नाहीत़ 50 व शंभर ग्रॅमसाठी दगड-धोंडे वापरले जातात़
भाजीबाजारात येणारा ग्राहक कुठलीही भाजी घेताना कमालीची घासाघीस करतो़ भाजीपाला व्यावसायिक दोन पैसे पोटाला मिळावेत म्हणून व्यवसाय करतात. मात्र ग्राहकाला त्याच्या भावातच वस्तू हवी असल्याने नाइलाजापोटी व्यावसायिक काटा मारतात, तर भाव न करणा:या ग्राहकाला मात्र पूर्ण वजनाची भाजी मिळत़े
भाजीपाला विक्रेत्यांकडे शॉप अॅक्ट नाही, कारवाई केलीच तर ते खरे नाव सांगत नाही, त्यामुळे न्यायालयात खटला उभा राहू शकत नाही, पोलिसांकडे बंदोबस्ताची मागणी केली, मात्र त्यांच्याकडून मनुष्यबळ नसल्याची अडचण पुढे केली जाते, असे वजन-मापे विभागाचे निरीक्षक  एच़एऩपवार म्हणाल़े शहरातील भाजीपाला विक्रेते वजन-माप विभागाकडून वजनांचे प्रमाणिकरण करीत असले तरी प्रत्यक्षात विक्री करताना प्रमाणित वजन वापरत नाही़़
एका किलोमागे 200 ग्रॅमची घट
दैनंदिन व्यापारात वजनकाटे कालबाह्य होऊन इलेक्ट्रॉनिक वजनकाटे वापरले जात असले तरी आठवडे बाजारात मात्र अद्यापही पारपंरिक पद्धतीचे वजनकाटे वापरले जात आहेत. शिवाय प्रमाणित वजने वापरणे तर सोडाच, 50 व शंभर ग्रॅमच्या वजनासाठी थेट दगड-गोटेच वापरले जात असल्याने ग्राहकांची दिवसाढवळ्या लूट सुरू आह़े एक किलो भाजीपाला घेतल्यानंतर प्रमाणित वजनकाटय़ावर त्याचे वजन केल्यानंतर तो 800 ते 850 ग्रॅम भरत आह़े किलोमागे ग्राहकांना 150 ते 200 ग्रॅमचा फटका बसत आह़े एक प्रकारे ही ग्राहकांची लूट असल्याचे जाणकारांचे मत आह़े
वजनमापे विभागाची हास्यास्पद कारवाई
वजनमापे विभागाची दरवर्षी 30 ते 40 भाजीपाला विक्रेत्यांवर होत असलेली कारवाई हास्यास्पद आह़े लूट थांबून प्रमाणित वजनकाटे वापरले जाण्यासाठी धडक कारवाईची अपेक्षा आह़े

Web Title: The measurement in the sale of vegetables is sin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.