वैद्यकीयच्या परीक्षेला शांततेत सुरूवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:12 AM2021-06-11T04:12:48+5:302021-06-11T04:12:48+5:30
जळगाव : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा गुरुवार १० जूनपासून सुरु झाल्या. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयदेखील ...
जळगाव : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा गुरुवार १० जूनपासून सुरु झाल्या. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयदेखील परीक्षेचे केंद्र असून पहिल्या दिवशी गुरुवारी १० रोजी परीक्षा दोन सत्रात पार पडल्या. पहिल्या दिवशी प्रथम आणि द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती राहिली. एकूण ३९५ विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत.
परीक्षा १० ते २३ जून दरम्यान दोन सत्रांमध्ये प्रारंभ झाली आहे. सकाळी ९. ३० वाजता विद्यार्थ्यांना परीक्षा हॉल मध्ये घेण्यात आले. केंद्रीय निरीक्षक डॉ.एस.एस. मडावी, केंद्र प्रमुख तथा उपअधिष्ठाता डॉ. अरुण कसोटे यांनी विद्यार्थ्यांचा कोरोना चाचणी अहवाल पाहूनच आत प्रवेश दिला. भरारी पथक प्रमुख डॉ. भारत घोडके यांनी तपासणी केली.
संभाव्य गैरप्रकारांवर सीसीटीव्ही व भरारी पथकाद्वारे कडक लक्ष ठेवण्यात येत आहे. दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील १५० व डॉ. उल्हास पाटील रुग्णालात २४५ असे ३९५ विद्यार्थी ही परीक्षा देत आहेत.