दुचाकीला लावलेली औषधींची बॅग लांबविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 04:12 AM2021-06-19T04:12:13+5:302021-06-19T04:12:13+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : औषधी घेण्यासाठी गेलेल्या तरुणाची दुचाकीला लावलेली औषधींची बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना बुधवारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : औषधी घेण्यासाठी गेलेल्या तरुणाची दुचाकीला लावलेली औषधींची बॅग अज्ञात चोरट्याने लंपास केल्याची घटना बुधवारी सायंकाळी जिल्हा रूग्णालयाजवळ घडली. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरूध्द जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील मेहरुण परिसरातील रहिवासी रिजवान जलीउद्दीन पिरजादे (२९) हा तरुण ममता केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट येथे कामाला आहे. त्यांच्या दुकानात लागणारी औषधी घेण्यासाठी रिजवान हा त्याच्या एमएच १९ ऐयू ४७८४ क्रमांकाच्या दुचाकीने भंगाळे डिस्ट्रीब्युटर्सकडे गेला होता. याठिकाणाहून त्याने काही औषधींची खरेदी केली व दुस-या औषधी घेण्यासाठी तो झवर ट्रेडलींग यांच्याकडे आला. तेव्हा त्याने दुचाकी जिल्हा रूग्णालयाजवळील साई वॉईन शॉपजवळ उभी करून आधी खरेदी केलेल्या औषधींची बॅक दुचाकीला लावून इतर औषधी घेण्यासाठी गेला. काही वेळानंतर औषधी घेवून परतल्यानंतर रिजवानला दुचाकीला लावलेली औषधींची बॅग दिसून आली नाही. या बॅगेत सुमारे ६ हजार १७ रुपयांची औषधी चोरट्यांनी लंपास केली.