१ लाख कुटुंबांना होणार औषधींचे वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2020 01:23 PM2020-05-25T13:23:25+5:302020-05-25T13:24:13+5:30
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने एक लाख कुटुंबांना ‘आर्सेनिक अल्बम ३०’ या होमिओपॅथी औषधीचे वाटप ...
जळगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने एक लाख कुटुंबांना ‘आर्सेनिक अल्बम ३०’ या होमिओपॅथी औषधीचे वाटप करण्यात येणार आहे. आतापर्यंत ५३ हजार बाटल्या तयार झाल्या. रविवारी दुसऱ्या टप्प्यात या औषधींचे अल्पबचत भवन येथे पॅकींग करण्यात आले असून यासाठी इंडियन रेडक्रॉस सोसायटी, एनएसएस, एनसीसी आणि विविध स्वयंसेवी संस्था प्रशासनाला मदत करीत असल्याची माहिती नोडल अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
या होमिओपॅथी औषधीचे पॅकिंगचा दुसरा टप्पा सुरू आहे. पहिल्या टप्प्यात सुमारे ५३ हजार बाटल्या तयार केल्या होत्या. दुसºया टप्प्यात १ लाख बाटल्यांचे पॅकींग करण्याचे उद्दीष्टे आहे. ही औषधे बॉटल्स मध्ये टाकून पॅकींग तयार करण्यासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना आणि रेडक्रॉस अशा एकूण ७५ स्वयंसेवकांनी होमिओपॅथी औषधी तयार करण्यासाठी पुढाकार घेतला.
यावेळी नोडल अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्यासह रेडक्रॉस उपाध्यक्ष गनी मेमन, सचिव विनोद बियाणी, रक्तपेढी चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, प्रकल्प प्रमुख डॉ अपर्णा मकासरे, डॉ. रितेश पाटील स्वप्नील वाघ उपस्थित होते. या कार्यासाठी प्रा. दीपक सोनवणे, प्रा. योगेश महाले, प्रा. डॉ. मोहिनी उपासने, डॉ.योगेश बोरसे, आकाश धनगर, गौरव पाटील, रितेश चौधरी, जयेश साळुंके, संजीवनी साळवे, दुर्गादास माळी, रोहन अवचारे, नेहरू युवा केंद्राचे जिल्हा समन्वयक नरेंद्र डागर, युवक प्रतिनिधी चेतन वाणी, स्वयंसेवक भूषण लाडवंजारी, डॉ. विक्रांत जाधव, उज्ज्वल साळुंखे, शिरीष तायडे, आकाश धनगर, हेमंत मांडोळे, देवेंद्र लाडवंजारी, निवेदिता ताठे परिश्रम घेत आहेत.