पारोळा पंचायत समितीला मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट, तब्बल १२ कर्मचारी गैरहजर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2019 09:02 PM2019-07-04T21:02:09+5:302019-07-04T21:02:56+5:30
पारोळा : येथील पंचायत समितीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी ४ जुलै रोजी सकाळी १० वाजता भेट ...
पारोळा : येथील पंचायत समितीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील यांनी ४ जुलै रोजी सकाळी १० वाजता भेट दिली. त्यावेळी विविध विभागांचे १२ कर्मचारी गैरहजर आढळून आले. सदर कर्मचारी नेहमी लेटफितीत असतात. या सर्वांची मुख्य कार्यकारी अधिकारी पाटील यांनी हजेरीपत्रकात गैरहजर म्हणून नोंद केली.
४ जुलै रोजी जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.बी.एन.पाटील हे स्वत: सकाळी १० वाजता पारोळा पंचायत समितीत दाखल झाले. यावेळी गटविकास अधिकारी आर.के.गिरासे हे रजेवर होते. डॉ.पाटील यांनी गटविकास अधिकारी यांच्या कार्यालयात बसून पंचायत समिती कार्यालय, एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालय, जिल्हा परिषद लघुसिंचन विभाग, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालयातील हजेरीपत्रक मागविले. यावेळी १०.३० वाजेपर्यंत एकूण १२ कर्मचारी गैरहजर होते. लेटफितीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या नावापुढे हजेरीपत्रकावर अबसेन्ट असे स्वत: मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी लिहिले. यात लघुसिंचन विभागाचे कनिष्ठ सहायक आय.यू.लोंढ, तर कनिष्ठ अभियंता आर.जे. मटकरी, व्ही.के.वाडेकर, व्ही.एम.कापुरे, व्ही.एस.राठोड यांच्यासह सात जणांचा समावेश आहे.
पंचायत समिती कार्यलयात विस्तार अधिकारी जी.एल.बोरसे, दिनेश बाबूलाल मोरे यांच्यासह आणखी तीन महिला कर्मचारी असे एकूण पाचजण लेटफितीत होते.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पाटील यांनी पंचायत समितीच्या सर्व विभागांची पाहणी केली. कर्मचा?्यांनी गळ््यात ओळखपत्र लावावे, कामकाजात सुधारणा करावी, स्वच्छतेकड लक्ष द्यावे आदी सूचना केल्या. पुन्हा आठ ते दहा दिवसात माझी पंचायत समितीला भेट असेल. त्यावेळीही रजेशिवाय कोणी गैरहजर राहिल्यास संबंधितावर कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी केला.
बायोमेट्रिक ठरतेय शोपीस
पंचायत समितीच्या कार्यालयात कर्मचा?्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून हे यंत्र बंद पडले आहे. त्यामुळे कर्मचारी उशिराने येतात.