मुक्ताईनगर येथे भाजपच्या खडसे समर्थक कार्यकर्त्यांची बैठक रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2020 05:38 PM2020-05-15T17:38:33+5:302020-05-15T17:39:06+5:30
विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून नाराज असलेले माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या ठराविक जळगाव येथील समर्थक प्रमुख कार्यकर्त्यांची शुक्रवारी होणारी बैठक रद्द करण्यात आली.
मुक्ताईनगर, जि.जळगाव : विधानपरिषदेच्या उमेदवारीवरून नाराज असलेले माजी महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या ठराविक जळगाव येथील समर्थक प्रमुख कार्यकर्त्यांची शुक्रवारी होणारी बैठक रद्द करण्यात आली.
विधानपरिषदेच्या उमेदवारीचे आश्वासन देऊनही ते पाळले न गेल्याने एकनाथराव खडसे हे कमालीचे नाराज आहेत. तीन दिवसांपूर्वीच खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत माजी मंत्री खडसे यांनी पक्षात लोकशाही राहिली नाही व अशीच परिस्थिती राहिली तर १०५ चे ५० आमदार झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर खडसे यांचे काही समर्थक यामध्ये जळगाव येथील कार्यकर्त्यांचा समावेश आहे. त्यांनी अचानक मुक्ताईनगर येथे शुक्रवारी बैठक घेण्याचे ठरवले होते. परंतु ही बैठक ऐनवेळी रद्द करण्यात आली.
एकनाथराव खडसे यांनी ती बैठक बोलावली नव्हती व तशी कोणतीही माहिती नसल्याचे त्यांचे स्वीय सहाय्यक योगेश कोलते यांनी सांगितले. लॉकडाऊननंतर राजकीय विषय बघू, असे माजी मंत्री खडसे यांनी स्पष्ट केले.