डायलिसीसबाबत बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:13 AM2020-12-23T04:13:43+5:302020-12-23T04:13:43+5:30
स्थायी समिती सभा जळगाव : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेचे ३१ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. आचारसंहिता असल्याने ...
स्थायी समिती सभा
जळगाव : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेचे ३१ डिसेंबर रोजी आयोजन करण्यात आले आहे. आचारसंहिता असल्याने केवळ चर्चा या सभेत होणार असून, कुठल्याही आर्थिक बाबी चर्चेसाठी ठेवण्यात येणार नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
सभेचा १८ नंतर मुहूर्त
जळगाव : जिल्हा परिषदेची मंगळवारी होणारी सर्वसाधारण सभा आचारसंहितेमुळे तहकूब करण्यात आली असून, १८ जानेवारीला ग्रामपंचायत निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर व आचारसंहिता उठल्यानंतर या सभेची तारीख जाहीर करण्यात येणार आहे.
मुख्य कार्यालयावर पेंटिंग
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात भिंती सजावटीची कामे सुरू असून, आता अधिष्ठातांच्या कार्यालयाच्या मुख्य भिंतींवर पेंटिंगची कामे सुरू करण्यात आली आहेत. यासह परिसरातील एका झोपडीवर वारली पेंटिंग काढून ही झोपडी सजविण्यात आली आहे.
कोरोना हद्दपार
जळगाव : यावल तालुक्यात कोरोनाचा एकच रुग्ण उपचार घेत असून, काही दिवसांपासून तालुक्यात रुग्ण आढळला नव्हता, होता तो रुग्णही बरा झाला. मंगळवारी ॲंटिजेन तपासणीत एक रुग्ण समोर आला.
मृत्युदर स्थिरच
जळगाव : मृतांची संख्या घटली असली तरी कोरोना रुग्णांच्या संख्येमुळे मृत्युदर स्थिर असल्याचे चित्र आहे. गेल्या महिना दीड महिन्यापासून जिल्ह्याचा मृत्युदर २. ३८ टक्के नोंदविण्यात येत आहे.
लसीकरणाला सुरुवात
जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात लहान बाळांच्या विविध लसीकरणाला सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या आठ ते नऊ महिन्यांपासून ही सुविधा या ठिकाणी ठप्प होती. ती मंगळवारपासून पूर्ववत झाली आहे.
वाहतूक कोंडीचा त्रास
जळगाव : नेरी नाका येथे चारही बाजूंनी वाहनांची वर्दळ राहत असल्याने वाहतुकीची मोठी काेंडी होत असून, वाहतूक पोलिसांची अनियमितता या ठिकाणी पहायवास मिळते, एका दिवशी तीन ते चार वाहतूक पोलीस या ठिकाणी तैनात असतात, तर दुसऱ्या दिवशी एकही कर्मचारी नसतो. त्यामुळे या परिसरात वाहतूक कोंडी ही नित्याचीच बनली असून, वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
पांडे चौकात जाम
जळगाव : मलनिस्सारण योजनेचे आता पांडे चौकात एका बाजुने काम सुरू झाले असून, यामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे. रुग्णालयात येणारी वाहने नियमित वापराचा रस्ता असल्याने या ठिकाणी मोठी वर्दळ असते, मात्र, आता एका बाजूची वाहतूक बंद आहे.