प्रत्येक टप्प्यावर भेटले मार्गदर्शक शिक्षक - सीईओ डॉ़ बी़ एऩ पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 01:43 PM2019-09-05T13:43:14+5:302019-09-05T13:43:56+5:30

शिक्षकांच्या हाती देशाचे भवितव्य, त्यांच्या मार्गदर्शनावरच घडत असते पिढी

Meeting Guides at Every Stage | प्रत्येक टप्प्यावर भेटले मार्गदर्शक शिक्षक - सीईओ डॉ़ बी़ एऩ पाटील

प्रत्येक टप्प्यावर भेटले मार्गदर्शक शिक्षक - सीईओ डॉ़ बी़ एऩ पाटील

Next

जळगाव : प्राथमिक शिक्षकांपासून ते अधिकारी बनण्यापर्यंतच्या प्रवासात प्रत्येक टप्प्यांवर आपल्याला मार्गदर्शक भेटत गेले ते आपल्यासाठी शिक्षक होते़, असे मत जिल्हा परिषदेचे सीईओ डॉ़ बी़ एऩ पाटील यांनी व्यक्त केले आहे़ शिक्षक दिनाच्या पूर्व संध्येला त्यांच्याशी संवाद साधला असता, शिक्षकांच्या हाती खरे देशाचे भवितव्य असते, असेही ते म्हणाले़ केवळ शाळेत शिक्षकविणारे शिक्षक नसतात आयुष्यात तुम्हाला वेगवेगळ्या मार्गांवर मार्गदर्शन करणारी व्यक्ती असतात, त्यांच्यामुळे तुम्ही योग्य मार्गावर जावून काहीतरी प्राप्त करीत असतात, असे मार्गदर्शक हे शिक्षकच़ शिक्षकांची भूमिका ही अनन्य साधारण आहे आहे़
पिढी घडविण्याचे काम ते करीत असतात, त्यांनी दिशा दिल्यानंतरच विद्यार्थी यशाच्या शिखरावर पोहचत असतात़ डॉ़ बी़ एऩ पाटील यांचे तळवाडे, ता़ सटाणा येथे प्राथमिक शिक्षण झाले़ नाशिक येथे माध्यमिक शिक्षण झाल्यानंतर बीएस्सी व एमएस्सी पुणे येथे झाले़ त्यांनी राजस्थान विद्यापीठातून पर्यावरण शास्त्रावर पीएच़डी केली़ त्यांनी जर्मनी येथे पर्यावरण व्यवस्थापनाचा कोर्स केला़ त्यांना युनाटेड नेशनसह विदेशात अनेक फेलोशीप मिळाल्या़ जलव्यवस्थापनावरही त्यांचे चांगले संशोधन आहे़
विद्यार्थ्यांना संकल्पना समजणे गरजेचे
मुल्य आधारीत शिक्षण देणे ही काळाची गरज आहे़ विद्यार्थ्यांना संकल्पना समजणे व या शिक्षणाचा दैनंदिन जीवन जगताना उपयोग होणे महत्त्वाचे आहे़ शिक्षणातून विद्यार्थ्याचा सर्वांगिण विकास होणे अपेक्षित आहे़ भौतीक, बौद्धीक व नैतीक या तीनही पातळ्यांवर समान विकास होणे गरजेचे आहे, असेही सीईओंनी सांगितले़
यशस्वी पिढी घडविण्याचे काम शिक्षकांचे़़़
शिक्षण पूर्ण करून सीईओ डॉ़ बी़ एऩ पाटील हे प्रशासकीय सेवेत कार्यरत झाले़ गेल्या सहामहिन्यापूर्वीच त्यांनी जळगाव जिल्हा परिषदेत पदभार घेतला आहे़ तसेच त्यांनी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे, यासाठी अनेक शाळांना भेटी दिल्या़ तसेच शिक्षकांशीही चर्चा केली़ पुढची यशस्वी पिढी घडविण्याचे काम हे शिक्षकांचे असते, त्यासाठी शिक्षकही उत्तम अध्यापन करतात़ जिल्ह्यातील आदर्श शिक्षकांचा इतर शिक्षकांनी आदर्श घ्यावा, व आठवणीत राहतील असे विद्यार्थी घडवावे, असेही त्यांनी सांगितले़
शिक्षकांनी खरोखर चांगला विद्यार्थी घडवावे़ कारण पायाच कच्चा राहिल्यास देश उभारणी कशी होणाऱ शिक्षकांवर देशाचे भवितव्य व विकास अवलंबून असतो़ हे लक्षात घेऊन अध्यापन करण्याची गरज आहे. शिस्त व शिक्षणातून पिढी घडविण्यासाठी शिक्षकांनी पुढे यायला हवे.

Web Title: Meeting Guides at Every Stage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव