फैजपूरला पालिका व व्यापाऱ्यांची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2020 03:44 PM2020-06-29T15:44:47+5:302020-06-29T15:45:35+5:30
पालिका सभागृहात रविवारी शहरातील व्यापारी तसेच भाजीपाला विक्रेते यांची बैठक रविवारी घेण्यात आली.
फैजपूर, ता.यावल : येथील पालिका सभागृहात रविवारी शहरातील व्यापारी तसेच भाजीपाला विक्रेते यांची बैठक रविवारी घेण्यात आली. प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले, मुख्याधिकारी किशोर चव्हाण यांनी मार्गदर्शन केले.
सोशल डिस्टिंग पाळणे, व्यापाऱ्यांनी मास्कचा वापर करणे, गर्दी होणार नाही याची दक्षता घेणे याविषयी प्रांताधिकारी थोरबोले, मुख्याधिकारी चव्हाण यांनी मार्गदर्शन केले. नियमांचे पालन न केल्यास कारवाई करण्याचा इशारा प्रांताधिकाºयांनी दिला.
प्रशासनातर्फे टप्प्याटप्प्याने व्यापाºयांचे स्वॅब घेऊन तपासणी करण्याचे नियोजन असल्याचे यावेळी सांगितले. मोठ्या व्यापाºयांनी आॅक्सिीमीटर व थर्मलस्क्रिनिंग मशीनचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले. विशेष करून बुधवारचा आठवडे बाजार हा बंद असताना दर बुधवारी अघोषित बाजार सुरू झालेला आहे. तो तातडीने बंद करावा अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा कडक इशारा भाजीपाला विक्रेते व अन्य व्यावसायिकांना प्रशासनातर्फे देण्यात आला.
यावेळी व्यापाºयांतर्फेही कंटेटमेंट झोनचे दिवस कमी करा, अशी आग्रही मागणी करण्यात आली. बैठकीस फैजपूर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक रोहिदास ठोंबरे, व्यापारी संघाचे पदाधिकारी व व्यापारी वर्ग व भाजीपाला विक्रेते उपस्थित होते.