पोलीस बंदोबस्तात झाली भुसावळ नगरपालिकेची सभा
By admin | Published: May 12, 2017 12:33 PM2017-05-12T12:33:20+5:302017-05-12T12:33:20+5:30
विविध विषयांवरून गाजली सभा. विरोधकांनी सत्ताधा:यांना धारेवर धरले
Next
भुसावळ,दि.12 - देशभरात भुसावळचा अस्वच्छतेत दुसरा क्रमांक आल्यानंतर स्वच्छता करण्यासाठी सत्ताधा:यांना जाग आल्यानंतर शुक्रवारी पालिकेत विशेष सभेचे आयोजन करण्यात आले. मात्र विविध विषयांवरून विरोधकांनी सत्ताधा:यांची कोंडी करीत पालिकेची सभा गाजवली़ विशेष म्हणजे प्रचंड पोलीस बंदोबस्तात पालिकेची सभा झाली़
अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष रमण भोळे होत़े व्यासपीठावर उपनगराध्यक्ष युवराज लोणारी, गटनेता मुन्ना तेली, मुख्याधिकारी बी़टी़बाविस्कर उपस्थित होत़े
विरोधकांनी गाजवली सभा
पालिकेत कचरापेटय़ा खरेदी करण्यासाठी पदाधिका:यांनी मोठय़ा प्रमाणावर कमिशन मागितल्याचा आरोप नगरसेवक दुर्गेश ठाकूर यांनी करत पालिकेकडे स्वच्छतेसाठी पैसे नसताना दुसरीकडे रेल्वे स्थानकावर मात्र इलेक्ट्रीक कार देण्याच्या वल्गना केल्या जात असल्याने तीव्र संताप व्यक्त केला़ विरोधी गटनेता उल्हास पगारे यांनीदेखील विषय क्रमांक एक ते पाचसाठी कायदेशीर प्रक्रिया राबवावी तसेच राजकीय हेतूने प्रेरीत होवून काम व्हायला नको, अशी अपेक्षा व्यक्त केली़ विषय क्रमांक आठ हा शंभर कचरा कुंडय़ा खरेदी करण्याचा असल्याने नगरसेवक संतोष दाढी चौधरी यांनी सत्ताधा:यांनी इतके दिवस काय केले? देशात दुसरा क्रमांक येण्यासाठी वाट पाहिली का? असे सांगत संताप व्यक्त केला़ सत्ताधा:यांची नुसतीच बोलचाल सुरू आहे, प्रत्यक्षात कृती शून्य असल्याची टीकादेखील करण्यात आली़ विरोधी गटाच्या महिला नगरसेवकांनीदेखील सत्ताधा:यांवर टीका केली़
पोलीस बंदोबस्तात झाली सभा
पालिकेची विशेष सभा वादळी ठरणार हे गृहित धरून पालिकेत पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता़ बाजारपेठ पोलीस ठाण्याचे निरीक्षक चंद्रकांत सरोदे यांच्यासह चार कर्मचारी सभा होईस्तावर सभागृहात ठाण मांडून होत़े बंदोबस्तात झालेल्या सभेला अनेक कंगोरे असल्याचे सूत्रांनी सांगितल़े