पारोळा निवडणूक शाखेकडून राजकीय प्रतिनिधींची बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2019 12:05 AM2019-09-22T00:05:40+5:302019-09-22T00:05:45+5:30
पारोळा : येथील तहसील कार्यालयात २१ रोजी निवडणूक शाखेकडून सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावण्यात आली होती. यावेळी तहसीलदार ...
पारोळा : येथील तहसील कार्यालयात २१ रोजी निवडणूक शाखेकडून सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावण्यात आली होती.
यावेळी तहसीलदार अनिल गवांदे, नायब तहसीलदार पंकज पाटील, सेना तालुकाप्रमुख प्रा.आर.ब.पाटील, भाजप तालुकाप्रमुख अतुल मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचेचे बाळू पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पिरणकुमार अनुष्ठान, माजी नगरसेवक राजू कासार, आर.पी.आय.तालुकाध्यक्ष पुंजू बि-हाडे, दलित सेनेचे जिल्हाध्यक्ष राजू जावरे, लोकजन शक्तीचे तालुकाध्यक्ष राकेश जावरे, योगेश रोकडे, समाधान मगर, सिद्धार्थ जावळे उपस्थित होते.
यावेळी पंकज पाटील यांनी मतदार संघात २९० बूथ असल्याचे सांगून त्यासाठी ३५० वोटिंग मशीन उपलब्ध असल्याचे सांगितले. आदर्श आचारसंहितेसाठी ६ भरारी पथके नेमण्यात आली आहेत. एक उमेदवार ४ अर्ज करू शकतो आदी नियमांबाबत माहिती दिली.
सुविधा अॅपची माहिती
उमेदवार खर्चमर्यादा २८ लाख आहे. नामांकन अर्जावर जसे नाव असेल तसेच नाव येईल. नावात बदल करायचा असल्यास तसा अर्ज द्यावा लागतो. अर्ज देताना सहीचा नमुना देणे गरजेचे आहे. प्रचाराचा खर्च रोजच्या रोज देणे गरजेचे असून मतदानाच्या दोन दिवस अगोदर प्रचार बंद करावा लागतो. पोस्टल मतदानाची यादी कोणालाही देता येणार नाही. सेटिंग सिलिंगची तारीख, वेळ, सर्व राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींनी उपस्थिती देणे गरजेचे असल्याचे स्पष्ट केले.