सोमवारपासून विद्यापीठात संशोधन व मान्यता समितीच्या सभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2019 09:58 PM2019-10-12T21:58:04+5:302019-10-12T21:58:41+5:30

जळगाव - कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामार्फत संशोधन व मान्यता समितीच्या (आर.आर.सी.) सभा विद्याशाखा व विषय निहाय विद्यापीठाच्या ...

Meeting of the Research and Accreditation Committee at the University starting Monday | सोमवारपासून विद्यापीठात संशोधन व मान्यता समितीच्या सभा

सोमवारपासून विद्यापीठात संशोधन व मान्यता समितीच्या सभा

Next

जळगाव- कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामार्फत संशोधन व मान्यता समितीच्या (आर.आर.सी.) सभा विद्याशाखा व विषय निहाय विद्यापीठाच्या विविध प्रशाळेत १४ ते १६ आॅक्टोबर दरम्यान आयोजित करण्यात आल्या असून विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून संशोधन आराखडा सादर करण्याचे आवाहन विद्यापीठाच्या संशोधन विभागाने केले आहे.

विद्यापीठामार्फत सन २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या पेट परीक्षा उत्तीर्ण केलेल्या व जुलै-२०१८ मध्ये प्री-पीएच.डी. कोर्सवर्क केलेल्या विद्यार्थ्यांची प्री-पीएच.डी. कोर्सवर्क पेपर १ व २ आॅनलाईन पुरक परीक्षा विद्यापीठाच्या आॅनलाईन परीक्षा सेंटरमध्ये ५ मे, २०१९ मध्ये घेण्यात आली होती. या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थांनी आपला संशोधन आराखडा मंजूर करुन घेण्यासाठी संशोधन व मान्यता समितीची (आर.आर.सी.) सभा १४ ते १६ आॅक्टोबर या दरम्यान होणार आहे. त्यामध्ये १४ रोजी सकाळी ११ वाजता युनिर्व्हसिटी इन्स्टिट्यूट आॅफ केमिकल टेक्नॉलॉजी येथे इंजिनिअरिंगच्या केमिकल, केमिकल टेक्नॉलॉजी,बायोटेक्नॉलॉजी, सिव्हील, इलेक्ट्रीक, इलेक्ट्रॉनिक्स ?ण्ड टेलिकॅम्युनिकेशन , इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स, मॅकेनिकल, प्रॉडक्शन अ‍ॅण्ड अ‍ॅटोमोबाईल, इन्स्ट्रुमेंटेशन व फार्मसी विषयांच्या सभा होतील. आणि स्कुल आॅफ कॉम्प्युटर सायन्सेय येथे इंजिनियरिंगच्या कॉम्प्युटर आणि इनफार्मेशन या विषयाच्या सभा होणार आहेत. स्कुल आॅफ मॅनेजमेंट स्टडिज येथे सकाळी ११ वाजता कॉमर्स अ‍ॅण्ड मॅनेजमेंट विषयांकरीता सभा होईल.

१५ रोजी सकाळी ११ वाजता स्कुल आॅफ लँगवेज अ‍ॅण्ड रिर्सच सेंटर येथे मराठी, इंग्रजी, हिंदी, संस्कृत व उर्दु या विषयांसाठी, स्कुल आॅफ सोशल सायन्सेस येथे इकोनॉमिक्स, हिस्ट्री, फिलॉसाफी, पॉलिटिकल सायन्स, सोशल वर्क्स, सोशालॉजी तर नॉलेज रिर्सोस सेंटर (सेंट्रल लायब्ररी) येथे डिफेन्स अ‍ॅण्ड स्ट्रॅटजिक स्टडिज,सायकोलॉजी, योगा आणि लॉ, डॉ. आंबेडकर थॉटस, लायब्ररी अ‍ॅण्ड इन्फार्मेशन, मास कम्युनिकेशन अ‍ॅण्ड जर्नालिझम या विषयांसाठी सभा होईल.

१६ रोजी सकाळी ११ वाजता स्कुल आॅफ फिजिकल सायन्सेस येथे फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, स्कुल आॅफ मॅथेमेटिकल सायन्सेस येथे मॅथेमॅटिक्स, स्टॅटस्टिक, स्कुल आॅफ केमिकल सायन्सेस येथे केमिस्ट्री, कॉम्प्युटर सायन्सेस येथे कॉम्प्युटर सायन्स, इन्फार्मेशन टेक्नॉलॉजी, स्कुल आॅफ लाईफ सायन्सेस येथे झुलॉजी, मायक्रोबायोलॉजी, बायोकेमिस्ट्री, बायोटेक्नॉलॉजी, बॉटनी, स्कुल आॅफ इन्व्हार्नमेंटल सायन्सेस येथे इन्व्हार्नमेंटल सायन्स, जिओग्राफी विषयाच्या सभा होणार आहेत. संबंधित विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून आपला संशोधन आरखडा मंजूर करुन घ्यावा. तसेच विद्यार्थ्यांनी त्यांच्या लॉगीनवरुन संशोधन आराखड्याचे शिर्षक १३ आॅक्टोबर पर्यंत अपलोड करावे.

जानेवारी, २०१९ मध्ये प्री-पीएच.डी. कोर्स आॅनलाईन परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे. व फेब्रुवारी ,२०१९ मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी संशोधन आराखडा संशोधन व मान्यता समितीपुढे सादर केलेले नाही किंवा सादर केल्यानंतर आराखडा नामंजूर करण्यात आलेला आहे. अशा विद्यार्थ्यांनीसुध्दा या समितीपुढे उपस्थित राहून संशोधन आराखडा मंजूर करुन घ्यावा, असे संशोधन विभागाचे उपकुलसचिव अ.चि.मनोरे, यांनी कळविले आहे.

Web Title: Meeting of the Research and Accreditation Committee at the University starting Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.