जामनेर येथे शिवसेना बैठकीत दोन गटात तूतू- मैंमैं!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 06:42 PM2017-12-25T18:42:04+5:302017-12-25T18:46:46+5:30
जामनेर नगरपालिकेवर स्वबळावर शिवसेना भगवा फडकविण्याचा निर्धार
आॅनलाईन लोकमत
जामनेर,दि. २५ : जामनेर तालुका शिवसेना पक्षाची बैठक सोमवारी दुपारी एक वाजता हिवरखेडा रोड एस.के.पोळ यांच्या निवासस्थानी झाली. बैठकीत तालुका प्रमुख पंडीत जोहरे यांनी जामनेर नगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेना स्व-बळावर नगराध्यक्ष व नगरसेवकपदासाठी २४ उभे करणार आहे. कार्यकर्त्यांनी परस्परांमधील मतभेद विसरून आपल्या प्रभागात मतदारांच्या समस्या सोडवाव्या असे आवाहन त्यांनी केले.
आगामी निवडणूक डॉ.मनोहर पाटील, दीपक राजपूत यांच्या नेतृत्वाखाली लढविली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. विधानसभा संघटक कृष्णा माळी यांनी मार्गदर्शन केले. यावेळी तालुका उपप्रमुख सुधाकर सराफ, शहर प्रमुख पवन माळी, विधानसभा संघटन प्रमुख कृष्णा माळी, विलास बारी, विनोद नाईक, नानेश्वर जंजाळ, एस.के.पोळ, रमेश जाधव यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
बॅनर वरून कार्यकर्त्यांमध्ये तूतू - मंै मंै
दरम्यान, बैठकीत जामनेर तालुका शिवसेना पक्षात डॉ.मनोहर पाटील व दीपक राजपूत यांचे दोन गट असल्याची चर्चा आहे. शहरात अनेक वेळा लावलेल्या बॅनर वरून एकमेकांचे फोटो न टाकण्यावरून बैठकीत कार्यकर्त्यांमध्ये तूतू-मंैमैं सुरू होऊन काही तणाव निर्माण झाला. पंडीत जोहरे, सुधाकर सराफ यांनी कार्यकर्त्यांना शांत केले.