मनमाड-नांदगाव दरम्यान रेल्वेचा मेगा ब्लॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2018 12:16 AM2018-10-09T00:16:16+5:302018-10-09T00:17:04+5:30

भुसावळ विभागातील मनमाड-नांदगाव रेल्वे सेक्शन दरम्यान उद्या ९ व १० आॅक्टोबर दरम्यान दोन दिवसाचा इंजिनिअरिंग व ओएचई ब्लॉक ठेवण्यात आला असून यामुळे भुसावळ येथून जाणाऱ्या चार गाड्यांचा खोळंबा होणार आहे.

Mega block of railway between Manmad-Nandgaon | मनमाड-नांदगाव दरम्यान रेल्वेचा मेगा ब्लॉक

मनमाड-नांदगाव दरम्यान रेल्वेचा मेगा ब्लॉक

Next
ठळक मुद्देभुसावळ येथून येणाºया चार गाड्यांचा होणार खोळंबादोन दिवसांचा असेल मेगा ब्लॉक

भुसावळ, जि.जळगाव : भुसावळ विभागातील मनमाड-नांदगाव रेल्वे सेक्शन दरम्यान उद्या ९ व १० आॅक्टोबर दरम्यान दोन दिवसाचा इंजिनिअरिंग व ओएचई ब्लॉक ठेवण्यात आला असून यामुळे भुसावळ येथून जाणाऱ्या चार गाड्यांचा खोळंबा होणार आहे.
५११५४ भुसावळ-मुंबई पॅसेंजर ही गाडी ९ ते १५ आॅक्टोबरपर्यंत रद्द राहील तर ५११५३ मुंबई -भुसावळ पॅसेंजर १० ते १६ आॅक्टोबरपर्यंत रद्द राहणार आहे.
९ व १० आॅक्टोबर दोन दिवस १५०१८ गोरखपूर कुर्ला टर्मिनस काशी एक्सप्रेस दुपारी १ ते ३ वाजेपर्यंत दोन तास हिस्वल स्थानकावर थांबेल. १२३३५ भागलपुर लोकमान्य टिळक टर्मिनस सुपरफास्ट एक्सप्रेस ही गाडी दुपारी २.१५ ते ३ वाजेपर्यंत नांदगाव रेल्वे स्थानकावर थांबा घेणार आहे.
याशिवाय १२५३३ लखनऊ-मुंबई पुष्पक एक्सप्रेस दुपारी २.१५ ते ३ वाजेपर्यंत नांदगाव रेल्वे स्थानकांवर थांबणार आहे. रेल्वे प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन भुसावळ रेल्वे वाणिज्य विभागातर्फे करण्यात आले आहे.




 

Web Title: Mega block of railway between Manmad-Nandgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.