रेल्वेतर्फे मेगाब्लॉक रद्द

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:30 AM2021-03-13T04:30:18+5:302021-03-13T04:30:18+5:30

जळगाव : मध्य रेल्वेतर्फे कसारा ते कल्याण स्टेशन दरम्यान १३ व १४ फेब्रुवारी रोजी तांत्रिक कामासाठी ब्लॉक घेण्याचे जाहीर ...

Megablock canceled by Railways | रेल्वेतर्फे मेगाब्लॉक रद्द

रेल्वेतर्फे मेगाब्लॉक रद्द

Next

जळगाव : मध्य रेल्वेतर्फे कसारा ते कल्याण स्टेशन दरम्यान १३ व १४ फेब्रुवारी रोजी तांत्रिक कामासाठी ब्लॉक घेण्याचे जाहीर करण्यात आले होते. मात्र, काही कारणास्तव हा ब्लॉक रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे जळगाव विभागातून मुंबईकडे धावणाऱ्या गाड्या या वेळेतच धावणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.

जिल्हा चित्रपट संघातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

जळगाव : कोरोनामुळे शहरासह जिल्ह्यातील चित्रपट गृहे बंद असल्यामुळे, येथील चित्रपट गृहांच्या मालकांना व तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठ्या आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या एक वर्षापासून चित्रपट गृहे बंद असल्यामुळे, कुटुंब चालविणे अवघड झाले आहे. तरी प्रशासनाने चित्रपट गृहांबाबत योग्य तो निर्णय घेऊन त्यांना अडचणीतून बाहेर काढावे, अशा मागणीचे निवेदन शुक्रवारी जळगाव जिल्हा चित्रपट संघातर्फे महेंद्र लुंकड संजय पाटील, आकाश सिंग, अभिजित लुंकड, अशोक पाटील, बाळासाहेब कुलकर्णी, प्रकाश अटवानी, प्रदीप पाटील आदी पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

Web Title: Megablock canceled by Railways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.