कळमसरे पाझर तलाव पहिल्याच पावसात तुडूंब !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 07:54 PM2018-06-03T19:54:29+5:302018-06-03T19:54:29+5:30

डार्क झोनमध्ये असलेल्या कळमसरे या अमळनेर तालुक्यातील गावातील नागरिकांनी शासनावर अवलंबून न राहता श्रमदान करून हरशा या पाझर तलावाची उभारणी केली. शनिवारी रात्री झालेल्या पहिल्याच जोरदार पावसामुळे हा पाझर तलाव तुडूंब भरला असून गावकऱ्यांच्या आनंदाला उधाण आले आहे.

 Melamares percolation pond first rain! | कळमसरे पाझर तलाव पहिल्याच पावसात तुडूंब !

कळमसरे पाझर तलाव पहिल्याच पावसात तुडूंब !

googlenewsNext
ठळक मुद्देगावकºयांनी श्रमदानातून उभारलेल्या तलावात झाला ७५ टक्के जलसाठाग्रामस्थांचा आनंद गगनात मावेना,भरलेला तलाव पाहण्यासाठी गर्दीपरिसरातील विहिरी रिचार्ज होण्याची आशा

आॅनलाईन लोकमत
कळमसरे, ता. अमळनेर : स्वत:ची समस्या स्वत:च सोडवली पाहिजे या उक्तीने प्रभावित होवून अवघ्या दोन महिन्यात गावकºयांनी सुमारे ८ हेक्टर पडीत क्षेत्रात श्रमदानातून भव्य असा हरशा नामक पाझर तलाव उभारला अन् शनिवारी रात्री झालेल्या जोरदार वृष्टीने सुमारे ७५ टक्के जलसाठा या तलावात झाला असून ग्रामस्थांचा आनंद गगनात मावेनाशा झाला आहे.
कळमसरे गावाच्या दक्षिण सीमेलगत असलेल्या पडीत क्षेत्रात ग्रामस्थांनी पाझर तलाव उभारण्याचा विडा उचलला. जानेवारी महिन्याच्या शेवटी श्रमदानाला सुरुवात केली. तीन महिन्यात ग्रामस्थांचे तलावाचे स्वप्न साकार झाले. पावसाच्या प्रतीक्षेत असतांना दरवर्षीच्या ७ जून तारखेचे वेळापत्रक ब्रेक करत, चतुर्थीलाच जोरदार पर्जन्यवृष्टी झाली. संध्याकाळी वादळ-वारा, वीज गायब, आकाशात विजांचा कडकडाट अशा आक्रमक स्वरुपात पावसाने हजेरी लावली अन् दुसºया दिवशी रविवारी सकाळी पाझर तलाव तुडूंब भरल्याचे पाहताच गावकºयांनी एकच जल्लोष केला. तलाव भरल्याचे वृत्त समजताच नागरिकांनी चिखल तुडवून त्याला गाठले. आणि यावेळी चेहºयावर आनंदाची झळाळी पसरली.
या तलावाची निर्मिती १९७२ साली झाली होती, परंतु पाणी साठा असलेला हाच तो हरशा तलाव याची प्रचिती श्रमदानानंतर जाणवू लागली. शासनाकडे पाठपुरावा करून ही निधी मिळत नव्हता, गाव डार्क झोन क्षेत्रात असल्याने बागायती तर संपल्या पण पिण्याच्या पाण्याचे हाल होत होते. या नैराश्यातून कळमसरे ग्रामस्थांना श्रमदानाची उभारी आली. ओझर येथील उद्योगपती संतोष लढ्ढा, आयकर आयुक्त संदीप साळुंखे यांनी मशिनरी उपलब्ध करून दिली आणि जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी सुटीचा दिवस या तलावाच्या श्रमदानात घालवून ग्रामस्थांचा उत्साह वाढविला.
श्रमाला फळ लाभले या भावनेने समस्त ग्रामस्थांनी मदतकर्त्यांचे आभार मानले. सर्वप्रथम ‘लोकमत’ ने सविस्तर वृत्त प्रसिध्द करून या पडीत क्षेत्राकडे गावकºयांचे लक्ष वेधले त्यामुळेच चालना मिळाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यंदा पावसाळा चांगला राहीला तर मार्च अखेरपर्यंत या तलावात साठा राहू शकतो असा अंदाज वयोवृध्द शेतकºयांनी व्यक्त केला.
तीन महिन्यात ३९० मीटर लांब, ८ मीटर रुंद, ४ मीटर उंच एवढा यु आकाराच्या या तलावात खेडी व वासरे या सिमेलगतच्या गावाकडून वाहत येणारे पाणी अडविण्यात आले आहे. त्यामुळे कळमसरे, खेडी, वासरे या गावांना सिंचनाचा मोठा फायदा होणार असून, विहीरी रिचार्ज होऊ शकतील. बागायती क्षेत्रात वाढीबरोबरच पिण्याच्या पाण्याची समस्या काही अंशी सुटेल.



 

Web Title:  Melamares percolation pond first rain!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस