पॅसेंजर बंद होऊन वर्षभरात मेमू ट्रेन धावणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2019 12:14 PM2019-09-14T12:14:18+5:302019-09-14T12:14:32+5:30

२ आॅक्टोंबरपर्यंत सर्व रेल्वे स्टेशन होणार प्लॅस्टीकमुक्त

The memo train will run all year long with the passenger closed | पॅसेंजर बंद होऊन वर्षभरात मेमू ट्रेन धावणार

पॅसेंजर बंद होऊन वर्षभरात मेमू ट्रेन धावणार

googlenewsNext

जळगाव : पॅसेंजर पेक्षा मेमू ट्रेनचा वेग जास्त आहे. या गाडीमध्ये प्रवासी बसण्याची क्षमताही जास्त आहे. ही गाडी सुुरु होण्यासाठी सर्व तांत्रिक कामे पूर्ण झाली असून, वर्षभरात सर्व मार्गावरच्या पॅसेंजर बंद होऊन मेमू ट्रेन धावतील, अशी माहिती रेल्वेच्या भुसावळ विभागाचे डीआरएम विवेककुमार गुप्ता यांनी दिली. तसेच येत्या २ आॅक्टोंबरपर्यंत सर्व रेल्वे स्टेशन प्लास्टीकमुक्त करण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले. गुप्ता यांनी शुक्रवारी सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलातील ‘लोकमत’ शहर कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. सहाय्यक महाव्यवस्थापक गौरव रस्तोगी यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्या सोबत सीनिअर डीसीएम आर. के. शर्मा, जनसंपर्क अधिकारी जीवन चौधरी व प्रवासी सल्लागार समितीचे सदस्य गनी मेमन उपस्थित होते. गुप्ता यांनी सांगितले की, मध्य रेल्वे मार्गावरील भुसावळ हे महत्वाचे स्टेशन असून दिल्लीसह पश्चिम भारतात जाणाºया सर्व गाड्या याच मार्गावरुन धावतात. या मार्गावर २४ तास गाड्यांची वर्दळ असते. गेल्या काही वर्षात तिपटीने गाड्यांची संख्या वाढली आहे. कृती कार्यक्रमात बहुतांश प्रश्न मार्गी प्रवाशांना दर्जेदार सुविधा व सुरक्षततेसाठी जून ते आॅगस्ट दरम्यान १०० दिवसांचा कृती कार्यक्रम हाती घेण्यात आला. या कार्यक्रमात प्रत्येक स्टेशन वायफाय सुविधा व सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली आहे. मेमूचा कारखाना भुसावळला मंजूर मेमू ट्रेनचे डबे बनविण्याचा कारखाना भुसावळला मंजूर झाला असून, २५ एकरावर हा कारखाना उभा राहणार आहे. महाराष्ट्रात फक्त भुसावळ व नागपूरला हा कारखाना सुरु होत असून, मेमू ट्रेनच्या डब्यापासून ते दुरुस्तीपर्यंत सर्व कामे या ठिकाणी होणार आहेत. विशेष म्हणजे यामुळे रोजगार निर्मिती वाढणार असून, वर्षभरात हा कारखाना सुुरु होईल. एलएचबी प्रकल्प उभारण्यासाठी जागा नाही रेल्वे मंत्रालयाने एलएचबी या अत्यानुधिक कोचेसचा प्रकल्प भुसावळला मंजुर केला आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. मात्र, या प्रकल्पासाठी १०० एकर एवढी जागा भुसावळला उपलब्ध नाही. यासाठी जागेचा शोध सुरु आहे.नुकतीच अकोला येथे या प्रकल्पासाठी जागेची पाहणी करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. पाच वर्षांत सर्व २०० फाटक बंद करणार रेल्वे प्रशसनाने रेल्वेच्या सुरक्षिततेसाठी पहिल्यादां भुसावळ विभागात असणारे सर्व २०० ठिकाणचे फाटक येत्या ५ वर्षांत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. फाटकांच्या ठिकाणी उड्डाणपूल व शक्य तिथे भूयारी गटारी बांधण्यात येत आहेत. येत्या डिसेंबरपर्यंत २५ ठिकाणचे फाटक बंद करणार असून, पुढील वर्षी ५० ठिकाणचे फाटक बंद करण्याचे नियोजन आहे. तर पाच वर्षांत सर्व ठिकाणचे २०० फाटक बंद होतील. स्टेशनवर सौर उर्जा प्रकल्प बसविणार रेल्वे मंत्रालयाने जास्तीत जास्त सौर उर्जेचा वापर करण्यावर भर दिला असून, सध्या भुसावळ स्टेशनवर सौर उर्जा प्रकल्प कार्यान्वीत करण्याची प्रक्रिया सुरु आहे. ज्यामुळे रेल्वेची भविष्यात मोठी विजेची बचत होणार आहे. भुसावळनंतर जळगाव, नाशिक, मनमाड, अकोला या सर्व स्टेशन हा प्रकल्प बसविण्यात येणार आहे.

Web Title: The memo train will run all year long with the passenger closed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jalgaonजळगाव