प्रदीपच्या लष्कराच्या आठवणी कुटुंबियांच्या स्मरणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 09:59 PM2020-07-25T21:59:52+5:302020-07-25T22:01:13+5:30

जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांचा खातमा करण्यासाठी लष्कराने राबविलेल्या ‘आॅपरेशन रक्षक’ मोहिमे दरम्यान अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात फेकरी (ता.भुसावळ) येथील जवान प्रदीप मनोहर पाटील २८ फेब्रुवारी २००३ रोजी शहीद झाला.

Memories of Pradeep's army in memory of the family | प्रदीपच्या लष्कराच्या आठवणी कुटुंबियांच्या स्मरणात

प्रदीपच्या लष्कराच्या आठवणी कुटुंबियांच्या स्मरणात

Next
ठळक मुद्देकारगील विजय दिन विशेषअतिरेक्यांशी लढताना शहीद अन् फेकरी गाव उजेडात

सुमित निकम ।
दीपनगर, ता.भुसावळ : जम्मू-काश्मीरमध्ये अतिरेक्यांचा खातमा करण्यासाठी लष्कराने राबविलेल्या ‘आॅपरेशन रक्षक’ मोहिमे दरम्यान अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात फेकरी (ता.भुसावळ) येथील जवान प्रदीप मनोहर पाटील २८ फेब्रुवारी २००३ रोजी शहीद झाला. यात फेकरी गावाचे नाव इतिहासात लिहिले गेल्याचे प्रदीपचे कुटुंब सांगतात. प्रदीप लष्कराच्या आठवणी सांगायच्या. त्या आजही स्मरणात असल्याचे त्याचे कुटुंबीय सांगतात.
१९ जुलै १९९९ रोजी लष्करात दाखल
भुसावळ शहरापासून अवघ्या चार किलोमीटर अंतरावर असलेल्या दीपनगर औष्णिक विद्युत केंद्राच्या शेजारी वसलेल्या चार हजार लोकसंख्येच्या फेकरी या गावात २६ सप्टेंबर १९७८ रोजी प्रदीपचा जन्म झाला. १९ जुलै १९९९ रोजी प्रदीप भारतीय सैन्य दलात दाखल झाला. त्याची सैन्यदलात गनर या पदावर नियुक्ती झाली. या पदावर कार्यरत असतानाच अंगातील चपळाई व हजरजबाबीपणा, धाडसी प्रवृत्ती, निर्णय क्षमता गुणांच्या जोरावर राजस्थानमधील जैसलनेर सीमेवर नियुक्ती झाली. नंतर नाशिक येथे देवळाली कॅम्पमध्ये नियुक्ती झाली.
प्रदीपचे कुटुंबीय
प्रदीपचा मोठा भाऊ किरण पाटील हा वसईमध्ये खासगी कंपनीत अभियंता आहे. त्याचा लहान भाऊ सुधीर मनोहर पाटील हादेखील बडोदा येथे सैन्यदलात कार्यरत आहे. प्रदीपला शहीद होऊन आज १७ वर्षे पूर्ण होत आहे. त्याच्या कुटुंबियांची माहिती जाणून घेतली असता त्यांची स्थिती मध्यम आहे. मात्र उदरनिर्वाह व्यवस्थित सुरू असल्याचे त्याचे वडील मनोहर पाटील यांनी सांगितले.
गावठाण जमीन मिळाली नाही
फेकरी ग्रामपंचायतीच्या वतीने आम्हाला जी गावठाण जमीन मिळायची होती ती मिळू शकली नाही. ग्रामपंचायतीत चक्कर गाठूनदेखील ‘आमच्याकडे गावठाण जमीन शिल्लकच नाही,’ असे वारंवार ग्राम पंचायतीकडून सांगण्यात आले, असे प्रदीपच्या वडिलांनी सांगितले.

Web Title: Memories of Pradeep's army in memory of the family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.