आठवणीतील रेडिओ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:11 AM2021-07-12T04:11:29+5:302021-07-12T04:11:29+5:30

लग्नात मुलाला हुंडा किंवा अहेर म्हणून दिला जायचा. नवरदेव खुश होऊन मनोरंजनाचा आस्वाद घ्यायचा. शेतात किंवा ...

Memory radio | आठवणीतील रेडिओ

आठवणीतील रेडिओ

googlenewsNext

लग्नात मुलाला हुंडा किंवा अहेर म्हणून दिला जायचा. नवरदेव खुश होऊन मनोरंजनाचा आस्वाद घ्यायचा. शेतात किंवा घरी तो सोबतच वागवायचा. लोकांना खूप अप्रूप वाटायचे. शेतकरी-कष्टकरी लोक संध्याकाळी शेतातून घरी आले की, थोड्या वेळाने चावडीवर जमून गाणी, बातम्या एकत्र बसून ऐकायचे.

अजूनही बालपणी ऐकलेले संगीत व गाणी आठवतात. दर रविवारी लागणारी बालगीते... त्यातील रवींद्रनाथ टागोर यांचे समूह गाणातील गीत आठवते.

‘कभी ॲटला चलो रे’ हे मला फार आवडायचे.

एकदा आकाशवाणी नागपूर येथून सन १९८७ मध्ये कवी शरद मुळे यांचे बालगीत लागले होते. ते शाळेतील वहीत लिहून ठेवले होते. अजूनही ते माझ्याजवळ आहे. ते असे होते,

‘छान, छान, छान

माझ्या माऊचं

पोर कसं गोरं गोरं पान..

इवले, इवले डोळे

त्यांचे इवले इवले कान

छान, छान, छान.

पुणे केंद्रावर ‘कृ. ब. निकुंब. यांचे एक गीत लागले होते, स्त्री मनातील भावना व्यक्त करणारे ते होते.

‘घाल, घाल पिंगा वारा

माझ्या परसात!

माहेरी जा सुवासाची, कर बरसात!’

हे गाणे ऐकून आई रडल्याचे आठवते. मराठी चित्रपटातील गाणे ऐकूनही ती रडायची. खास करून लेक चालली सासरलामधील गाणे ऐकून. कारण तिच्या मुलीला सासुरवास जर झाला तर, या विचारानेच ती घळाघळा रडायची.

पंधरा ऑगस्ट, २६ जानेवारी यावेळी स्वातंत्र्य गीते ऐकली की अंगावर रोमांच उभे राहायचे आणि स्फुरणही चढायचे.

रेडिओवर सिलोन, विविध भारती लागायचे. त्यात लागणारे रात्रीचे बिनाका, सिबाका, मनातील गाणे लावायचे .त्यातील अमीन सयामी यांच्या आवाजाची सवय झालेली.

त्याकाळची सुपरहिट गाणी ऐकताना ती ती गाणीही संपू नयेत, असे वाटायचे. त्यांच्या आवाजात जादू होती.

आता रेडिओवर एफएम आले; पण आधी जो आनंद मिळायचा तो आता नाही. एका क्लिकवर गाणी मोबाइलमध्ये पाहता, ऐकता येतात; पण मनात पिंगा घालणारी गाणी जर रेडिओवर लागले, तर ते ऐकण्याचे सुख फार वेगळे आहे. त्यासाठी कर्णसेनच हवेत. ‘गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी.’

- मीना ओंकार सैंदाणे, जळगाव

Web Title: Memory radio

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.